देश

Yaas चक्रीवादळ पुढच्या 24 तासात बंगालला धडकणार

स्नेहल कदम

रत्नागिरी : 'तौक्ते' चक्रीवादाळानंतर (tauktae cyclone) आता समुद्रकिनारी भागात 'यास' (Yaas cyclone) चक्रीवादळ येऊन धडकले आहे. बंगालच्या उपसागरात (bengal) गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची संकेत हवामान खात्याने (India Meteorological Department) दिले आहेत. 25 मे पर्यंत 'यास' चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते अतितीव्र चक्रीवादळात रुपांतरीत होणार आहे. म्हणजेच येथे वाऱ्याचा वेग ताशी 118-165 किमी असण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ बंगालाला धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील विदर्भ भागात उष्ण वातावरण राहणार असून महाबळेश्वरसह काही थंड हेवेच्या ठिकाणी वातावरण जैसे थे असेल असे संकेत हवामान खात्याने वर्तवले आहेत.

बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळात ओडिशा, पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्यावर धडकणार (odisha, west bengal, bangladesh) आहे. या वादळामुळे बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा जोर वाढला आहे. या किनारपट्टीवर प्रतितास ५५ ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज वर्तवाल जात आहे. सोमवारी (२४) सायंकाळपर्यंत त्याचा वेग ११० किलोमीटरवर जाईल. मंगळवारी चक्रीवादळाची तीव्रता वाढून ताशी १७० किलोमीटरपर्यंत, तर बुधवारी ताशी १८५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हे कमी दाबाचे क्षेत्र अंदमानातील पोर्ट (andaman port) ब्लेअरपासून उत्तरेकडे ५६० किलोमीटर, ओडिशातील पॅरादीपपासून आग्नेयेकडे ५९० किलोमीटर, बलासोरेपासून आग्नेयेकडे ६९० किलोमीटर, पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० किलोमीटर अंतरावर होते. या चक्रीवादळाच्या वाढत्या तीव्रतेमुळे दोन ते तीन दिवस कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच किनारी भागातही राहू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

सद्यःस्थितीत श्रीलंकेच्या (shrilanka) दक्षिण किनारपट्टीवर मॉन्सून दाखल झाला आहे. यंदा किनारपट्टी भागात झालेल्या 'तौक्ते' चक्रीवादाळनंतक आता बंगालच्या उपसागरातील निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनच्या प्रवासाची गती वाढली आहे. शिवाय या भागात स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून ठिकठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT