देश

Yaas चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीला धडकलं, समुद्रात उंच लाटा

सूरज यादव

यास वादळ ओडिशा किनारपट्टीला धडकणार आहे. यामुळे ओडिशा, बंगालपासून झारखंडपर्यंत वेगवान वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांत ‘यास’च्या प्रभावामुळे ताशी १६० किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागने व्यक्त केला आहे.

यास चक्रीवादळ ओडिसाच्या किनारपट्टीला धडकले असून पश्चिम बंगालसह ओडिशातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. 140 हून जास्त किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. समुद्रात 6 मीटर उंच लाटा उसळल्या आहेत.

पश्चिम बंगाल - यास चक्रीवादळामुळे वादळी वारे घोंगावत असून 24 परगणा जिल्ह्यात घरांचे छत हवेत उडाले आहेत.

यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोलकाता विमानतळ बंद करण्यात आलं आहे. तसंच लष्कराच्या तुकड्या किनारपट्टीवर तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफने पाच राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात 115 पथके तैनात केली आहेत.

ओडिशा - चक्रीवादळाची तीव्रता वाढत चालली असून ओडिशातील बालासोरपासून 50 किमी अंतरावर त्याचे केंद्र आहे. काही तासातच वादळ धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

पश्चिम बंगाल - कोलकात्यात पाऊस, पूर्व मिदनापूरच्या हलदिया भागातील दृश्ये

ओडिशात चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग वाढला असून मुसळधार पाऊस पडत आहेत. दुपारपर्यंत चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरावरून ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या किनारी भागात ताशी १५५ -१६५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग १८५ किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुढील १२ तासात चक्रीवादळ उत्तर-वायव्य दिशेकडे सरकणार असून अति तीव्र वादळात त्याचे रूपांतर होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

ओडिशातील बालासोर आणि भद्रक या किनारी जिल्ह्यांदरम्यान धरमा बंदराजवळ बुधवारी सकाळी यास चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.

बंगालमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

पश्‍चिम बंगालला यास चक्रीवादळापूर्वी मंगळवारी वावटळीचा सामना करावा लागला. हुगळी जिल्ह्यातील चीनसुरा येथे वावटळीदरम्यान वीज पडून दोनजण मृत्युमुखी पडल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत झाली. एक मिनिटभर उठलेल्या या वावटळीत ४० घरे उद्धवस्त झाली. यातील बेघर झालेल्या नागरिकांनी शाळेच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले.

चक्रीवादळासाठी उपाययोजना

- ओडिशातील धरमा बंदरावर दुपारपर्यंत धडकणार

- धरमा व पारादीप बंदरांना अतिधोक्याचा इशारा

- बालासोर जिल्ह्यात चंडीपूर येथे लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

- सखल भागातील रहिवाशांसाठी बाराशे निवारा केंद्रांची उभारणी

- कोरोनामुळे सर्व केंद्रांचे निर्जंतुकीकरण

- सरकारला सहकार्य करीत निवारा केंद्रात आसरा घेण्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे नागरिकांना आवाहन

- कोरोनाच्या निर्बंधांचे पालन करीत दोन मास्क घालण्याची सूचना

- पारादीप पोर्ट ट्रस्टने सुरक्षेसाठी सर्व काम थांबविले

- ओडिशा, पश्‍चिम बंगाल आंध्र प्रदेश, तमिळनाडू, झारखंड व अंदमान व निकोबार येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) ११३ तुकड्या तैनात

- ओडिशात सर्वाधिक ५२ तर पश्‍चिम बंगालमध्ये ४५ तुकड्या

- कलकत्ता उच्च न्यायालयाकडून आज आणि उद्या होणाऱ्या खटल्यांची सुनावणी रद्द

- आंध्र प्रदेशमध्ये कोरोना रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा खंडित न होण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT