Yashwant Sinha Latest News Yashwant Sinha Latest News
देश

यशवंत सिन्हांकडून CAA बाबत मोठे विधान; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रपती म्हणून निवडून आलो तर नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू होणार नाही याची काळजी घेईन, असे विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी सांगितले. आसाममधील गुवाहाटी येथे विरोधी पक्षाच्या खासदारांशी संवाद साधताना सिन्हा (Yashwant Sinha) यांनी हे सांगितले. (Yashwant Sinha Latest News)

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अद्याप सीएए लागू केलेले नाही. कारण, ते घाईत ‘मूर्ख मसुद्या’सारखे बनवले गेले आहे. नागरिकत्व हा आसामसाठी मोठा प्रश्न आहे. सरकारला हा कायदा देशभरात आणायचा होता. परंतु, अद्याप ते करू शकले नाही, असेही आसाममधील (Assam) विरोधी खासदारांशी संवाद साधताना यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) म्हणाले.

पूर्वी सरकारने कोरोना विषाणूचे निमित्त पुढे केले. कोरोना आटोक्यात आल्यानंतरही ते नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करू शकलेले नाही. कारण, हे घाईघाईने केलेले मूर्खपणाचे कृत्य आहे. मी राष्ट्रपती (President) म्हणून निवडून आल्यास सीएए लागू होणार नाही याची खात्री करेन, असेही यशवंत सिन्हा म्हणाले.

संविधानाला सत्तेत असलेल्यांकडून धोका

संविधानाला बाहेरील शक्तींकडून नाही तर सत्तेत असलेल्यांकडून धोका आहे. आपण त्याचे रक्षण केले पाहिजे, असेही यशवंत सिन्हा म्हणाले. यशवंत सिन्हा हे १८ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी आसामच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT