Yati Narsinghanand  Team eSakal
देश

'तुम्ही सगळे मरणार'; वादग्रस्त वक्तव्य प्रकरणातील कारवाईवर नरसिंहानंद संतापले

हरिद्वार येथील धर्मसंसदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी जितेंद्र नारायण त्यागींना अटक करण्यात आली.

सुधीर काकडे

हरिद्वार धर्म संसदेत मुस्लिम धर्मियांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी पहिली अटक केली आहे. या अटकेमुळे संतप्त झालेल्या यति नरसिंहानंद (Yati Narsinghanand) यांनी पोलिस अधिकाऱ्यांना, 'तुम्ही सर्व मरणार आहात' असा शापच दिला आहे. द्वेषपूर्ण भाषण दिल्याप्रकरणी आरोपी धर्मगुरूंमध्ये यति नरसिंहानंद यांचाही समावेश आहे. हरिद्वार येथे आयोजित धर्म संसदेत कथित वादग्रस्त वक्तव्य (Heat Speech Case) केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी वसीम रिझवी उर्फ ​​जितेंद्र नारायण त्यागी याला अटक केली. या प्रकरणातील ही पहिली अटक आहे.

उत्तराखंड पोलिसांनी यति नरसिंहानंद आणि आणखी एक आरोपी साध्वी अन्नपूर्णा यांना नोटीस बजावून हजर राहण्यास सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी त्यागीला ताब्यात घेताना नरसिंहानंद यांना सहकार्य करण्याची विनंती करताना दिसत आहेत. कारमध्ये बसलेले यती नरसिंहानंद त्यागीला अटक का करत आहे, असे विचारताना दिसत आहेत. यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात त्यांना अटक करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नरसिंहानंद म्हणाले, "सर्व गोष्टींमध्ये मी त्यांच्यासोबत आहे. त्यांनी हे काम एकट्याने केलं का? आमच्या पाठिंब्याने तो हिंदू झाला आहे." मात्र आता तरीही ते पोलिसांनी कारवाई थांबवली नाही. त्यानंतर नरसिंहानंद म्हणाले की, "तुम्ही सर्व मराल अन् तुमची मुलंही..."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT