Yavatmal was the first gay wedding
Yavatmal was the first gay wedding 
देश

यवतमाळात झाला होता पहिला समलिंगी विवाह 

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाने आज समलैंगिक संबंध हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसल्याचा निर्वाळा देऊन त्याला कायदेशीर मान्यता दिली. मात्र, गेल्या वर्षी यवतमाळात वैदिक मंत्रोच्चारात दोन तरुणांचा समलैंगिक विवाह पार पडला होता. त्या वेळी फार मोठे वादंग उठले होते. 

मूळचा यवतमाळचा रहिवासी व सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियात वास्तव्याला असलेल्या ऋषी याने विन्ह या विदेशी मुलासोबत 30 डिसेंबर 2017 रोजी यवतमाळातील एका हॉटेलमध्ये मोजक्‍या नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह केला होता. हा विवाह वैदिक पद्धतीने मंत्रोच्चारात पार पडला होता. 
ऋषी व विन्ह हे जोडपे ऑक्‍टोबर 2016 पासून एकत्र राहत होते. त्यांची ओळख एका ऑनलाइन डेटिंग वेबसाइटवरून झाली होती. काही महिन्यांतच त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. ऋषींच्या आई-वडिलांनी या विवाहाला विरोध केला. परंतु, त्यांनी आपल्या गृहशहरातच विवाह करण्याचा निर्धार केल्याने अखेर आई-वडिलांनी त्यांचे लग्न करून दिले. 

ऋषी हा यवतमाळातील प्रतिष्ठित व्यावसायिकांचा मुलगा असून, विन्ह हा व्हिएतनामचा रहिवासी आहे. दोघेही विवाहापासून कॅलिफोर्नियात वास्तव्याला असून, बहुराष्ट्रीय कंपन्यांत मोठ्या हुद्यावर आहेत. तसेच ते "एलजीबीटी' (लेस्बियन गे, बायसेक्‍शुअल ट्रान्सजेंटर) यांच्या हक्कांसाठी जागतिकस्तरावर संघटना चालवितात. ऋषीचे कुटुंबीयदेखील अमेरिकेतच स्थलांतरित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऋषी साठवणे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT