Yayati - Dnyanpith Puraskar esakal
देश

Yayati - Dnyanpith Puraskar : अन् मराठी भाषेला मिळाला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार...

वि.स. खांडेकरांना ययाति कादंबरीसाठी इ.स. १९७४ साली भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च पुरस्काराने...

सकाळ डिजिटल टीम

Yayati - Dnyanpith Puraskar : ययाति ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे ह्याची जाणीव होते. वि.स. खांडेकरांना ययाति कादंबरीसाठी इ.स. १९६० मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने आणि इ.स. १९७४ साली भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यातील ज्ञानपीठ ट्रस्ट ऑफ इंडियाने दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या २२ भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणारा भारतातील कोणताही नागरिक या पुरस्कारासाठी पात्र आहे. अकरा लाख रुपये रोख, मानपत्र आणि वाग्देवीची कांस्य मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९६५ मध्ये १ लाख रुपयांच्या बक्षीस रकमेसह सुरू झालेला हा पुरस्कार २००५ मध्ये ७ लाख रुपये करण्यात आला, जो सध्या अकरा लाख रुपये आहे.

पहिला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ १९६५ साली देण्यात आला. त्या वेळी १९२० ते १९५८ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याचा विचार करण्यात आला होता. प्रसिद्ध मल्याळी महाकवी गोविंद शंकर कुरूप यांना ‘ओडोक्वुफल’ (वेळूची बासरी) या महाकाव्याबद्दल हा प्रथम पुरस्कार देण्यात आला.

१९६५ ते २०२२ पर्यंत एकूण ५७ ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले; पण गौरव ५९ साहित्यिकांचा झाला. कारण आत्तापर्यंत पाच वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. पुरस्कार सुरू झाल्यापासून सिंधी या भारतीय भाषेतील साहित्यास अद्यापि पुरस्कार लाभलेला नाही. १९८२ पर्यंत हा पुरस्कार लेखकाच्या एकाच कार्यासाठी दिला जात होता. पण तेव्हापासून ते लेखकाच्या भारतीय साहित्यातील एकूण योगदानासाठी देण्यात आले आहे.

सर्वाधिक म्हणजे दहा वेळा हिंदी भाषेला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे; कन्नड भाषेला आठ वेळा, तर मराठी भाषेला चार वेळा सन्मानित करण्यात आले आहे. १९७४ चा दहावा ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्यांदा मराठी भाषेने पटकावला. वि.स. खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीस हा पुरस्कार देण्यात आला.

‘ययाति’च्या रूपाने शाश्वत मूल्यांची आठवण भाऊसाहेब खांडेकर यांनी करून दिली आहे. या साहित्यकृतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्या वेळी भाषा सल्लागार समितीत (L.A.C.) मराठी भाषेसाठी डॉ. य.दि. फडके, डॉ. अशोक केळकर आणि कवी मंगेश पाडगावकर हे होते. मध्यवर्ती निवड समितीत प्रा.मं.वि. राजाध्यक्ष यांचा समावेश होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gunratna Sadavarte : संविधानाच्या राज्यात पाटीलकी चालत नाही, विखे पाटलांनी घोटाळा केलाय; सदावर्तेंचा घणाघात

Raigad News : संकटमोचक जीवरक्षक सागर दहिंबेकर, धाडस समर्पण व सेवाभावाने हजारो जणांचे वाचवले प्राण

Latest Maharashtra News Updates : २०२५-२६ कापसासाठी किमान किंमत आणि ५५० खरेदी केंद्रांचा आढावा

Electric Vehicle : अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Crime News : ‘मेरी गर्लफ्रेंड को छेडता है’: एका आरोपावरून नाशिक हादरले; अल्पवयीन आरोपीचा क्रूर खून

SCROLL FOR NEXT