Yoga Guru Baba Ramdev esakal
देश

Baba Ramdev : 2024 पूर्वी देशात समान नागरी कायदा लागू करा; रामदेव बाबांचं मोदी सरकारला आवाहन

आपल्या डोळ्यासमोर भव्य राम मंदिर (Ram Temple) उभारलं जावं, हे जनतेचं स्वप्न आहे.

सकाळ डिजिटल टीम

UCC आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याचं काम 2024 पूर्वी होईल, अशी सरकारकडून अपेक्षा आहे.

योगगुरू बाबा रामदेव (Yoga Guru Baba Ramdev) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या केंद्र सरकारकडं देशात समान नागरी संहिता (Uniform Civil Code UCC) आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची (Population Control Act) मागणी केलीये.

सरकारनं या दिशेनं लवकरात लवकर प्रभावी पावलं उचलावीत आणि 2024 पूर्वी हा कायदा लागू करावा, असंही ते म्हणाले आहेत.

आपल्या डोळ्यासमोर भव्य राम मंदिर (Ram Temple) उभारलं जावं, हे जनतेचं स्वप्न आहे. पुढील वर्षी जानेवारीत राम मंदिराचं उद्घाटन होणार, ही आनंदाची बाब आहे. देशात कलम-370 हटवण्यात आलं. आता फक्त दोनच कामं उरली आहेत, असं बाबा रामदेव म्हणाले.

UCC आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याचं काम 2024 पूर्वी होईल, अशी सरकारकडून अपेक्षा आहे. नऊ दिवस चालणाऱ्या संन्यास दीक्षा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी रामदेव बाबांनी या गोष्टी स्पष्ट केल्या. योगगुरू रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या उपस्थितीत ऋषीग्राममध्ये नऊ दिवसीय संन्यास दीक्षा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं.

योगगुरू म्हणाले, राम मंदिर जागतिक प्रतिष्ठेसह पूर्णत्व प्राप्त करेल. पतंजलीमध्ये सनातन धर्माला विश्वधर्म म्हणून, स्थापित करण्यासाठी संन्याशांची दीक्षा घेतली जात आहे. संन्यास घेतलेल्या तरुण-तरुणींसाठी ऋषीग्रामची स्थापना करण्यात आली आहे. नऊ दिवस दीक्षा घेणारे तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये उपवास आणि पूजा करतील. चारही वेदांचं अनुष्ठान केलं जाईल. सर्व मुलं-मुली ऋषीग्राममध्ये नऊ दिवस राहणार आहेत. पतंजली ऋषीग्राममध्ये 60 तरुण आणि 40 तरुणी संन्यासाची दीक्षा घेणार आहेत. स्वामी रामदेव सर्वांना संन्यास दीक्षा देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT