modi yogi amit shah gadkari esakal
देश

पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी कोण? शाह, योगी की गडकरी; लोकांची कोणाला पसंती?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- लोकसभेच्या निवडणुका आठ ते नऊ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. एनडीएसह विरोधकांची इंडिया आघाडी निवडणुकांची तयारी करत आहेत. निवडणुकांचे निकाल काय लागतील याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असेल. इंडिया टुडे-सीव्होटर मूड ऑफ नेशन सर्व्हेने आपले काही अंदाज व्यक्त केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्ताराधिकारी कोण असेल याबाबत यात सर्व्हे घेण्यात आला होता. (Home Minister Amit Shah is best suited to succeed Prime Minister Narendra Modi)

सर्व्हेनुसार, २९ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी म्हणून अमित शहा यांना पसंती दिली आहे. त्यानंतर लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पसंत केलं आहे. योगी आदित्यनाथ यांना सर्व्हेमधील सहभागी लोकांनी २६ टक्के मते दिली आहेत, तर नितीन गडकरी यांच्या नावाला १५ टक्के लोकांनी मत दिले.

भाजप सरकारला हरवण्यासाठी प्रमुख २७ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी भाजपचा पराभव करु शकेल का? तसेच येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता मोदींना पुन्हा निवडून देईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर इंडिया टुडे आणि सीव्होटरनं केलेल्या 'मूड ऑफ नेशन्स' या सर्व्हेतून समोर आली आहेत.

इंडिया टुडे- सी वोटरच्या सर्व्हेनुसार, विरोधकांची इंडिया आघाडी मोदी सरकारला वरचढ ठरणार नाही. सर्व्हेला जितक्या लोकांनी प्रतिसाद दिला त्यांपैकी ५४ टक्के लोकांना असं वाटतं की, इंडिया आघाडी भाजपला हारवू शकत नाही. तर ३३ टक्के लोकांना वाटतं की, इंडिया आघाडी नक्कीच भाजपचा पराभव करेल.

इंडियाचे प्रमुख पद कोण स्वीकारेल?

२४ टक्के लोकांना वाटतं की राहुल गांधी इंडिया आघाडीचं नेतृत्व चांगल्या प्रकारे करु शकतात. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रत्येकी १५ टक्के लोकांनी दिली. याच प्रश्नावर जानेवारीत झालेल्या सर्व्हेमध्ये राहुल गांधी यांना केवळ १३ टक्के लोकांनी पसंती दिली होती. पण, आता त्यांना जास्त मते मिळाली आहेत. केजरीवाल यांच्या पारड्यात २७ टक्के लोकांनी पसंती टाकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT