देश

लोकसंख्यावाढीवरून भाजपमध्ये जुंपली; योगींना नक्वींचं प्रत्युत्तर, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

लखनौ - जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोठ विधान केलं होतं. योगींच्या विधानानंतर भाजप नेते आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनी विरोधी दर्शविणारं ट्विट केलं आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीच्या मुद्दावरून भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. (Yogi Adityanath news in marathi)

योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रभावी प्रयत्न करत असतानाच समाजातील लोकसंख्येचे संतुलन बिघडू नये याकडेही लक्ष दिले पाहिजे. विशिष्ट वर्गाची लोकसंख्या झपाट्याने वाढते आणि इथल्या मूळ लोकांची लोकसंख्या कमी होईल, असं व्हायला नको, असं योगींनी म्हटलं.

योगी पुढं म्हणाले की, ज्या देशांमध्ये लोकसंख्या जास्त आहे, तिथे लोकसंख्येचा असमतोल चिंतेची बाब बनला आहे. याचा विविध धर्मांच्या लोकसंख्येवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे काही काळानंतर अराजकता निर्माण होते.

दुसरीकडे भाजपनेते नक्वी यांनी ट्विट करून म्हटलं की, लोकसंख्येचा विस्फोट धर्मिकतेचा मुद्दा नसून देशाची समस्या आहे. त्याला जात-धर्माशी जोडणे योग्य नाही. नुकताच केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणारे नकवी यांचे हे योगी यांच्या विधानानंतर आलं आहे. नक्वी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला असून भाजप त्यांना उपाराष्ट्रपती पदाचा उमेदवार बनविण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये धर्मांतरण आणि महिला शोषण प्रकरणात नवा वळण

SCROLL FOR NEXT