yogi adityanath is only cm presence with pm narendra modi in ayodhya for ram mandir bhoomi pujan 
देश

रामजन्मभूमीच्या भूमिपूजनासाठी 'या' एकमेव मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

अशोक गव्हाणे

नवी दिल्ली : आयोध्यामध्ये रामजन्मभूमीच्या भूमिपूजन सोहळ्याची तयारी जोरात चालू आहे. अशात राममंदिर प्रशासनाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वगळता देशातील कोणत्याही दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना न बोलावण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांनी ही माहिती दिली. याबाबत 'आजतक'ने वृत्त दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

रामजन्मभूमीच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी केवळ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ उपस्थित राहणार असून भूमिपूजन सोहळ्याची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशातील अनेक महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. परंतु, यामध्ये योगी आदित्यनाथ वगळता कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेले नाही.

चंपत राय म्हणाले, 'कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना न बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारी संपल्यावर सर्वांना एकत्रित बोलवण्याची आमची योजना असल्याचेदेखिल त्यांनी सांगितले. भूमिपूजनाच्यावेळी आमचा मुख्यमंत्री संमेलन भरवण्याचा विचार नाही. भूमिपूजनाचा कार्यक्रम किती वेळ चालेल याविषयी त्यांनी माध्यमांना माहिती देण्याचे टाळले. भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी सरकारने आणि आरोग्य विभागाकडून कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल. आम्ही सांधू-संताना एक आवाहन केले आहे की, त्यांनी दोन दिवस आधीच मंदिरात रामायण, हनुमान चालीसेचे पठन, भजन आणि किर्तन करावे. तसेच ०५ ऑगस्टच्या रात्री लोकांनी आपल्या घराच्या बाहेर दीपप्रज्वलन करावे, अशी माहितीही चंपत राय यांनी दिली.

भूमिपूजनाच्या वेळी ५०-५० लोकांचे समूह करण्यात येतील. पहिल्या ५० जणांच्या समूहात साधू संत, दुसऱ्या समूहात देशातील राजकीय तसेच राममंदिर आंदोनलातील महत्वाच्या व्यक्तींना स्थान देण्यात येईल, अशा प्रकारे हे समूह असतील. यामध्ये लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांच्यासोबत साध्वी ऋतंभरा, विनय कटियार अशा लोकांचा समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT