देश

'योगींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा'

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये पोलिस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्यासह दोन जणांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नाही. त्यामुळे राज्यातील 83 माजी अधिकाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून, या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. याबाबतचे पत्रकच त्यांनी जाहीर केले.  

योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याबाबतचे पत्रक ज्या अधिकाऱ्यांनी काढले, यामध्ये 83 अधिकारी 4-5 वर्षांपूर्वीच निवृत्त झाले आहेत. या पत्रकात त्यांनी सांगितले, की सुबोधसिंह यांच्या हत्येप्रकरणाचा तपास करण्याऐवजी चुकीच्या दिशेने याप्रकरणाचा तपास केला जात आहे, असा आरोप या अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच हिंसाचार भडकावणाऱ्या आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिस गोकशीच्या आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, बुलंदशहरमध्ये झालेला हिंसाचार भडकवणाऱ्या आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT