Office1 
देश

सरकारी कार्यालये, बाजारपेठा 5 दिवस राहणार सुरु

वृत्तसंस्था

लखनौ : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता आठवड्यातून पाच दिवस कार्यालये आणि बाजारपेठा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवार ते शुक्रवारपर्यंत कार्यालये आणि बाजारपेठा सुरु करण्यात येतील. तर शनिवार आणि रविवारी सर्वच कार्यालये आणि बाजारपेठा बंद असतील, असा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळी 5 वाजेपर्यंत 55 तासांचा लॉकडाऊन लागू केला. आता हाच नियम पुढेही राहणार आहे. या दोन दिवसांच्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. योगी आदित्यनाथ यांनी कोविड-19 व्यवस्थापनाच्या टीमसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. यामध्ये आठवड्यात पाच दिवस सरकारी कार्यालये सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवस सरकारी कार्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार आहेत.

अनलॉकच्या दिशेने देश जात असताना दुसरीकडे मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा वाढला आहे. त्यानुसार आता खबरदारी घेतली जात आहे.

उत्तर प्रदेशात रुग्णसंख्या 35 हजारांवर

उत्तर प्रदेशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. गेल्या 24 तासांत 1403 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35,092 वर गेली आहे. तर यामध्ये आत्तापर्यंत 913 नागरिकांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला. सध्या उत्तर प्रदेशात 11,490 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 22,689 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT