lakhimpur kheri sakal
देश

लखीमपूर खिरी घटना: योगी सरकारने दाखल केलं प्रतिज्ञापत्र

लखीमपूर घटनेतील साक्षीदारवर झालेला हल्ला वैयक्तिक वादातून असल्याचं सरकारने म्हंटलंय.

सकाळ डिजिटल टीम

लखीमपूर खिरी घटनेतील साक्षीदारावर झालेला हल्ल्याचा आरोप योगी सरकारने नाकारलाय. होळीदरम्यान वैयक्तिक वादातून हा हल्ला झालेला असल्याचं उत्तरप्रदेश सरकारने म्हंटलयं. लखीमपूर खिरी घटनेतील पिडीत आणि साक्षीदारांना सुरक्षा पुरविली जात असुन,सुरक्षा मुल्यांकन देखील करण्यात येतंय. तसेचं पीडीत आणि साक्षीदार त्यांना मिळणाऱ्या सुरक्षेबद्दल समाधानी असल्याचं देखील सुप्रीम कोर्टासमोर सांगितलंय. आरोपी आशिष मिश्रा यांच्या जामीनाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान उत्तरप्रदेश सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. (Lakhimpur Khiri incident)

आरोपी आशिष मिश्रा हा केंद्रिय राज्यमंत्र्याचा मुलगा आहे. आरोपी आशिष मिश्रा याच्या जामीनाविरोधात सरकारने भूमिका घेतली असल्याचंही म्हंटलय. १६ मार्चला आशिष मिश्रा यांच्या जामिनाविरोधात सुप्रीमकोर्टात दाखल याचिकेसंदर्भात उत्तरप्रदेश सरकारला नोटीस पाठविली होती. आरोपी आशिष मिश्रा जामीनावर बाहेर येताच साक्षीदारावर हल्ला झाला होता.

मुख्य न्यायाधीश एन वी रमणा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या खंडपीठाने लखीमपूर खिरी घटनेतील पीडीत आणि साक्षीदारांना पूर्ण सुरक्षा देण्याबाबत आदेश दिले होते. १० फेब्रुवारीला अलाहाबाद हायकोर्टाने आरोपी आशिष मिश्राला जामीन दिला होता.

३ ऑक्टोबर २०२१ रोजी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने भरधाव वेगाने गाडी घातली होती. यात अनेक शेतकऱ्यांचा आणि पत्रकाराचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT