‘यूपी’तील माफियांवर योगींचे बुलडोझर
‘यूपी’तील माफियांवर योगींचे बुलडोझर sakal
देश

‘यूपी’तील माफियांवर योगींचे बुलडोझर

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : यापूर्वीचे उत्तर प्रदेशचे सरकार माफियांना संरक्षण देत होते. आता योगी सरकार त्यांच्यावर बुलडोझर चालवत आहे. पूर्वी महिला घराबाहेर पडताना दहा वेळेस विचार करायच्या, आता गुन्हेगार एखादा गुन्हा करण्यापूर्वी दहावेळेस विचार करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बलारामपूर येथे आज शरयू कालवा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शरयू कालवा प्रकल्पाचे स्वप्न तब्बल ४३ वर्षांनंतर साकार होत आहे. ८०८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे गोंडा, बलरामपूर, बहराईच, श्रावस्तीसह नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

हसूआडोल गावात आयोजित सभेत बोलताना मोदी म्हणाले, की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार महिलांसाठी काम करत आहे. यानुसार पंतप्रधान निवास घरकुल योजनेतंर्गत महिलांच्या नावाने घर देण्यात येत आहेत. महिलांसाठी शौचालय बांधण्यात आले, वीज कनेक्शन देण्यात आले आणि स्वयंपाकाचा गॅसही दिला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, की जेव्हा मी दिल्लीतून येत होतो, तेव्हा मी विचार करत होतो की कोणीतरी म्हणेल की, त्याची फित आपणच कापली. कदाचित त्यांनी बालपणीच या योजनेची फीत कापली असेल. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुमचे काम हे फीत कापण्याचे आहे आणि आमचे काम हे योजना पूर्ण करण्याचे आहे. हे डबल इंजिनच्या सरकारची कमाल आहे. उत्तर प्रदेशात पाच दशकांपेक्षा अधिक काम पाच वर्षात झाले आहे.

बिपिन रावत यांना आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, रावत जेथे असतील, तेथून ते देशाचा विकास पाहतील. एक सैनिक लष्करात असेपर्यंत सैनिक राहत नाही तर संपूर्ण आयुष्य एखाद्या योद्ध्याप्रमाणे जगत असतो. त्यांचा प्रत्येक क्षण हा शिस्त आणि देशासाठी समर्पित केलेला असतो. हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वीर योद्ध्यांप्रती संवेदना व्यक्त करतो. रावत यांचे जाणे ही मोठी हानी आहे. त्यांनी देशाच्या सशस्त्र दलास आत्मनिर्भर करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

नऊ जिल्ह्यांतील २५ लाख शेतकऱ्यांना लाभ

शरयू कालवा प्रकल्प योजना दहा हजार कोटी खर्चातून साकारली आहे. त्यामुळे पूर्वांचलमधील ९ जिल्ह्यांतील २५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल. ही योजना पूर्ण होण्यासाठी ४ दशके लागली. १९७८ मध्ये इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाची बहराईच जिल्ह्यातून सुरवात झाली होती. तेव्हा त्याचे बजेट ७९ कोटी रुपये होते. १९८२ मध्ये बलरामपूरसह ९ जिल्ह्यांना या प्रकल्पाशी जोडले आहे. २०१७ पर्यंत त्याचे ५२ टक्केच काम झाले होते. परंतु योगी सरकार आल्यानंतर साडेचार वर्षात उर्वरित ४८ टक्के पूर्ण केले.

भारतीय सध्या शोकाकूल आहेत. परंतु आपण आपल्या कामाचा वेग थांबवू शकत नाही आणि विकासही. भारत थांबणारा नाही. आपण समस्त भारतीय खूप मेहनत करू आणि देशासमोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा सामर्थ्याने सामना करू. भारताला आणखी शक्तिशाली आणि समृद्ध करू.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eid ul Adha 2024: बकरी ईद निमित्त कुर्बानी द्यायच्या पशूंचे तपासणी शुल्क दोनशे वरून वीस वर; राज्य सरकारचा निर्णय

IND W vs SA W: भारतीय संघाचा पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड; आशा शोभनानं 4 विकेट्स घेत गाजवलं पदार्पण

Sheena Bora Murder Case : हाडे सापडलीच नव्हती... इंद्राणीचा सांगाडा अन् राहुल मुखर्जीबाबत मोठा दावा, जाणून घ्या काय म्हणाली?

T20 World Cup चालू असतानाच शुभमन गिल अन् आवेश खान का परतले भारतात? अखेर टीम इंडियाच्या कोचनेच केला खुलासा

आम्ही लग्नाळू! मॅट्रिमोनी साईटवरही नाही मिळाली मुलगी, युवक थेट न्यायालयात; वेबसाईटला दिले भरपाई देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT