Swiggy Treat Tweet Viral esakal
देश

Swiggy Tweet Viral : सॅनिटरी पॅडसोबत तुम्हालाही मिळेल का चॉकलेट? स्विगीचं ट्वीट व्हायरल, हे वाचाच

मला बॅगच्या तळाशी चॉकलेट कुकीजचे काही पॅकेट सापडले... पण हे कोणी केले, स्विगीने की दुकानदाराने?”

सकाळ डिजिटल टीम

Swiggy Instamart: स्विगीचे इन्स्टामार्ट सध्या खूप लोकांची पसंती आहे, वर्किंग वुमनसाठी तर हा उत्तम पर्याय आहे, कारण यामुळे त्यांच्या खर्च होणारा वेळ वाचतो आहे, शिवाय यावर आपल्याला डिस्काउंट सुद्धा मिळतो ज्याने लोकांचे पैसेही वाचतात. 

स्विगीचे एक्सप्रेस ग्रोसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म इन्स्टामार्ट देशात अधिकाधिक लोकप्रिय होत आहे आणि त्याच्या जलद सेवांमुळे जीवन अधिक सोयीस्कर बनले आहे. किराणा दुकानात जाण्याऐवजी, लोक स्विगीच्या इन्स्टंट डिलिव्हरी अॅपवर १५ मिनिटांत दैनंदिन गरजांसाठीच्या वस्तू मिळवू शकतात.  

असंच एका महिलेने स्विगी इन्स्टामार्ट वरून सॅनिटरी पॅड ऑर्डर केलेले आणि गंमत म्हणजे या ऑर्डर सोबत तिला त्या पॅकेटमध्ये काही चॉकलेट कुकीज मिळाल्याने तिला आनंदाने आश्चर्य वाटले. या महिलेचे नाव समीरा असून त्यांनी ही बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेयर केली.

समीराने ट्विटर करत सांगितले, “मी स्विगी इन्स्टामार्टवरुन सॅनिटरी पॅड्स मागवले आणि मला बॅगच्या तळाशी चॉकलेट कुकीजचे काही पॅकेट सापडले. खूप सुंदर विचार.. पण हे कोणी केले, स्विगीने की दुकानदाराने?”  

या ट्वीटवरती स्विगीने रिप्लाय केला, “तुमचा दिवस चांगला जावो या आमच्या सदिच्छा आहेत.. समीरा” 

दरम्यान, सोशल मीडिया वापरकर्त्यांपैकी स्विगीच्या या वर्तवणुकीचे काही लोकांनी खूप कौतुक केले, तर काहींनी सांगितले की स्विगी नियमितपणे आपल्या ग्राहकांना मार्केटिंगच्या दृष्टीने अशा गोष्टी देत असतं. 

"इन्स्टामार्ट त्यांच्या स्वतःच्या डार्क स्टोअरमधून याचा पुरवठा करते. त्यामुळे निश्चितपणे हा SOP चा भाग आहे. त्यासाठी तुम्ही स्विगीचे आभार मानू शकता," असे एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले. 

दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ''ग्राहकांना आनंद देण्यासाठी आणि उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी हा उद्देश आहे. आम्हालाही अशी ट्रीट मिळाली आहे.” 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT