Shatrughn Sinha 
देश

PM पदासाठी राहुल गांधींकडं दुर्लक्ष करता येणार नाही; शत्रुघ्न सिन्हांचं मोठं विधान

पुढील वर्षी देशात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे, त्यामुळं पंतप्रधान कोण होऊ शकतं याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पाटणा : पुढील वर्षी देशात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे, त्यामुळं पंतप्रधान कोण होऊ शकतं याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यामध्ये अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून राहुल गांधी यांच्याकडं दुर्लक्ष होऊ शकत नाही, असं विधान सिन्हा यांनी केलं आहे. (You cannot ignore Rahul Gandhi as PM face in 2024 says Shatrughan Sinha)

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, नितीश कुमार हे एक यशस्वी नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी उत्कृष्ट काम केलं आहे. त्याचबरोबर २०२४ साठी तुम्ही पंतप्रधानपदचा चेहरा म्हणून राहुल गांधींकडं दुर्लक्ष करु शकत नाहीत. कारण त्यांनी काढलेली 'भारत जोडो यात्रा' ही क्रांतीकारी होती. त्याचबरोबर ममता बॅनर्जी या २०२४ च्या निवडणुकीत गेमचेंजर ठरु शकतात.

तेजस्वी यादव हे चांगलं काम करत आहेत. त्यांना राजकारणातला बराच अनुभव मिळाला आहे. त्यांच्याकडं बिहारचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपदासाठी शिक्षण महत्वाचं नाही, फक्त पाठिंबा गरजेचा आहे. पंतप्रधान चहा विकत होते यावर माझा विश्वास नाही. हे केवळ एक प्रोपोगंडा आहे, अशा शब्दांत शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT