Himanta Biswa Sharma Arvind Kejriwal Sakal
देश

"काळजी सोडा, मोदीजी करतायत!"; दिल्ली व आसामच्या मुख्यमंत्र्यांत Twitter वॉर

केजरीवाल आणि हिमंता बिस्व शर्मा यांच्यातल्या प्रश्नोत्तराचा खेळ चांगलाच रंगतोय.

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांच्यात सध्या ट्विटर वॉर चाललं आहे. हिमंता बिस्व शर्मा यांनी केजरीवालांवर निशाणा साधला आहे. देशाला नंबर १ बनवण्याची तुमची मोहीम थांबवा, असं म्हणत टोलाही लगावला आहे.

हिमंता बिस्व शर्मा यांनी काल एक ट्वीट केलं. आम्ही सध्या सहा माध्यमांमध्ये शिक्षण देतोय. ज्यात १४ विविध आदिवासी भाषांचाही समावेश आहे. आपल्या विविधतेबद्दल आम्हाला अभिमान आहे. अनोख्या शिक्षण पद्धतीतून विविधता कायम राखण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि हो, आमच्याकडे दिल्लीप्रमाणे काही साधनं नाहीत. पण आमच्याकडे जे आहे आणि आम्ही जे केलंय, त्याचा आम्हाला अभिमान आहे.

पुढच्या ट्विटमध्ये शर्मा यांनी केजरीवालांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, जेव्हा तुम्ही आसाममध्ये असाल, तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्याकडच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेऊ. तुमच्या मोहल्ला क्लिनिक पेक्षा ती कॉलेजेस हजार पटीने चांगली आहेत. तसंच आमच्या सरकारी शाळेतल्या हुशार शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही भेटा. आणि हो, देशाला एक नंबर बनवण्याची काळजी सोडून द्या, ते मोदीजी करत आहेत.

त्यावर अरविंद केजरीवाल यांनीही उत्तर दिलंय. आपल्या ट्वीटमध्ये केजरीवाल म्हणतात, आमच्याकडे एक म्हण आहे. कोणी विचारलं की, मी कधी येऊ आणि तुम्ही म्हणालात की कधीही या. तेव्हा त्याचा अर्थ असतो की, कधीच येऊ नका. मी तुम्हाला विचारलं की तुमची सरकारी शाळा पाहायला मी कधी येऊ. तेव्हा तुम्ही सांगितलंच नाही. सांगा तरी, कधी येऊ, तेव्हाच येईन मी.

काय आहे हे प्रकरण?

जिथे दहावीत विद्यार्थी नापास झाले आहेत, तिथल्या शाळा बंद करण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे. केजरीवाल यांनी याच निर्णयावरुन आसाम सरकारवर निशाणा साधला आहे. शाळा बंद करणं हा उपाय नाही, असं केजरीवाल म्हणाले आहे. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांनी त्याला उत्तर देताना आसाममधल्या शाळांच्या संख्येबद्दलची सविस्तर माहिती सादर केली. त्यावेळी केजरीवाल यांनी आपला आसाम सरकारवर टीका करण्याचा हेतू नव्हता असं सांगितलं आहे. तसंच, आपण आसाम सरकार करत असलेलं चांगलं काम बघण्यासाठी तिथं जाऊ, असंही सांगितलं. मेक इंडिया नंबर १ या केजरीवाल यांच्या मोहिमेच्या संदर्भाने बोलताना केजरीवाल म्हणाले की भारतीय नंबर एक तेव्हाच बनतील, जेव्हा ते एकमेकांकडून शिकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : ...तर माझे खासदार का फोडले- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT