Arvind Kejriwal Sakal
देश

तुम्ही महागाई वाढवली, मी दिलासा देतोय, पण मी..; केजरीवालांचा भाजपला टोला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी अरविंद केजरीवाल सरकारच्या वीज अनुदान योजनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया आली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटलं की, गुजरातला "आप" ची मोफत वीज हमी खूप आवडली. त्यामुळे भाजपला दिल्लीतील मोफत वीज बंद करायची आहे. मात्र दिल्लीच्या नागरिकांनो विश्वास ठेवा, मी तुमची मोफत वीज कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही. शिवाय गुजरातच्या जनतेला मी आश्वासन देतो की जर गुजरातमध्ये सरकार स्थापन झाले तर १ मार्चपासून तुमची वीजही मोफत होईल.

दुसऱ्या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी लिहिले की, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रचंड टॅक्स लावला आहे. प्रचंड महागाई वाढून ठेवली आहे. तुम्ही लोकांचे रक्त शोषत आहात. अशा परिस्थितीत मी जनतेला मोफत वीज देऊन थोडा दिलासा दिला तर तोही तुम्हाला सहन होत नाही का? तेही थांबवायचे का? मात्र मोफत वीज देणे कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असंही केजरीवाल यांनी म्हटलं.

वीज वितरण कंपन्यांना सबसिडीची रक्कम देण्यात अनियमितता झाल्याचे आरोप करण्यात आले असून राज्यपालांनी या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी सात दिवसांच्या आत मुख्य सचिवांकडे या संदर्भात अहवाल मागवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT