Love Jihad  Sakal
देश

Love Jihad : मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्यांचा दबाव; तरूणाची राहत्या घरी आत्महत्या

मृत दुष्यंत याने तीन वर्षापूर्वी मेरठ येथील फरहा नावाच्या मुस्लीम मुलीशी नातेवाईकांच्या परवानगीशिवाय लग्न केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तरप्रदेशमधील एका २३ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याने एका मुस्लीम मुलीशी तीन वर्षापूर्वी लग्न केले होते. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडून त्याला धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुष्यंत चौधरी असं आत्महत्या केलेल्या तरूणांच नाव असून तो शनिवारी आपल्या खोलीत झोपला होता. सकाळी बराच वेळ तो खोलीच्या बाहेर न आल्यामुळे त्याची आई शिक्षादेवी यांनी खोलीत जाऊन बघितले तर दुष्यंतचा मृतदेह लटकत होता.

त्यानंतर मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर आत्महत्येचं मुख्य कारण समजेल असं सीओ अरविंद चौरसिया यांनी सांगितलं.

दरम्यान, मृत दुष्यंत याने तीन वर्षापूर्वी मेरठ येथील फरहा नावाच्या मुस्लीम मुलीशी नातेवाईकांच्या परवानगीशिवाय लग्न केलं होतं. त्यानंतर काही दिवस ते आपापल्या घरी राहिले. दुष्यंत आपल्या पत्नीला आपल्या घरी घेऊन येणार होता.

पण त्याच्या सासरच्या लोकांनी अगोदर धर्मपरिवर्तन करण्याची अट घातली. जर तू इस्लाम धर्म स्वीकारत धर्मपरिवर्तन केले तर मुलगी त्याच्याबरोबर पाठवू असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे तो मागच्या काही दिवसांपासून तणावात होता अशी माहिती मृत दुष्यंत याचा चुलतभाऊ जॉनी चौधरी याने सांगितलं.

तर या प्रकरणी पोलिसांनी फरहासहित तिच्या कुटुंबातील चार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT