CCTV Footage Sakal
देश

CCTV Footage : जीम करताना कोसळला अन् क्षणात 24 वर्षीय पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

एक महिन्यातील तरूणाचा हृदयविकाराने झालेला हा दुसरा मृत्यू आहे.

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : हैदराबाद येथील जीममध्ये व्यायाम करताना एका २४ वर्षीय पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशाल असं मृत्यू झालेला तरूणाचं नाव असून तो असिफ नगर पोलिस स्टेशन येथे कार्यरत होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुरूवारी रात्री जीममध्ये त्याचा मृत्यू झाला. एक महिन्यातील तरूणाचा हृदयविकाराने झालेला हा दुसरा मृत्यू आहे.

अधिक माहितीनुसार, गुरूवारी रात्री विशाल जीममध्ये व्यायाम करत असताना त्याला अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याने तिथे असलेल्या एका मशिनचा आधार घेतला आणि जमिनीवर बसला पण त्यानंतर तो कोसळला. तो खाली पडल्यानंतर तिथे उपस्थित असलेले तरूण त्याच्या मदतीसाठी धावले. काही तरूणांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, कोरोना काळानंतर तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले असून अनेक तरूणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान माहिती केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, तरूणांच्या एकूण मृत्यूपैंकी २० टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT