देश

अकाली दलाच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या; घटना CCTV मध्ये कैद

सकाळ डिजिटल टीम

भरदिवसा बेछूट गोळीबार करून झालेल्या या हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मोहाली - पंजाबच्या मोहाली सेक्टर 71 मधील कम्युनिटी सेंटरजवळ शनिवारी दुपारी युवा अकाली दलाचा नेता विक्की मिड्डूखेडाची हत्या करण्यात आली. भरदिवसा बेछूट गोळीबार करून झालेल्या या हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत मोहालीसह, चंडिगढ, पंचकुला सीमेवर नाकाबंदी केली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. सीसीटीव्ही पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

सीसीटीव्ही फूटेजनुसार, 4 आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले होते. त्यांनी 9 राउंड फायर करून विक्की मिड्डूखेडाची हत्या केली. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विक्कीला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

विक्की हा अकाली दलाचा नेते अजय मिड्डूखेडा यांचा लहान भाऊ तर SOI विद्यार्थी संघटनेचा सदस्य होता. अजय यांनी स्थानिक पंचायत राज निवडणुकीत माजी महापौरांच्या मुलाविरोधात निवडणूक लढली होती. विक्कीचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. अजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब युनिव्हर्सिटीतमध्ये विक्कीचा काही लोकांसोबत वाद सुरु होता. त्यादृष्टीने पोलिस चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT