देश

Land Dispute: धक्कादायक! जमिनीच्या वादातून तरुणाला चिरडलं; ट्रॅक्टर आठ वेळा अंगावरुन नेला, जागीच मृत्यू

या प्रकारामुळं राजकारणही चांगलच तापलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बयाना (राजस्थान) : जमिनीच्या वादातून आपल्याच सख्ख्या लोकांना भीषण हाणामारीच्या घटना आपण पाहिल्या आहेत. याचाच पुनः प्रत्यय नुकताच एका व्हायरल व्हिडिओतून आला आहे. राजस्थानातील भारतपूर जिल्ह्यातील बयाना भागात बुधवारी ही अमानुष घटना घडली आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. (Youth Crushed to Death With Tractor Over Land Dispute in Rajasthan Bharatpur)

राजस्थान पोलिसांच्या माहितीनुसार, बयाना इथल्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अड्डा गावात गुर्जर कुटुंबात बऱ्याच काळापासून जमिनीचा वाद सुरु होता. बुधवारी हा वाद टोकाला पोहोचला. यावेळी नरपत सिंह या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्यात आलं. ठार झालेला आणि ठार मारणारा हे दोघे भाऊ आहेत.

आठ वेळा अंगावरुन चालवला ट्रॅक्टर

या घटनेमध्ये आरोपीनं नरपत गुर्जरच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. मागच्या चाकाखाली आल्यानंतर त्याच्या अंगावरुन आठ वेळा ट्रॅक्टर चालवण्यात आला. यावेळी कुटुंबातील इतर लोकांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्यानं हा विरोध जुमानला नाही आणि ट्रॅक्टर चालवण सुरुच ठेवलं.

पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांनी गावातून पळ काढला. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी पथक पाठवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: 0 टक्के मेकिंग चार्जेसच्या नावाखाली ज्वेलर्स करत आहेत ग्राहकांची फसवणूक; होऊ शकतं लाखोंच नुकसान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ वाढविण्याचा पुन्हा इशारा; म्हणाले- पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलंय पण...

Women's ODI World Cup 2025 SF Scenario : १ जागा, पाच स्पर्धक! भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अन् न्यूझीलंड कसे पोहोचणार उपांत्य फेरीत?

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

Marriage Fraud : लग्नानंतर काही मिनिटांतच वधू भूर्रर्र...; नाशिकच्या शेतकरी तरुणाला चार लाखांना गंडवले, काही क्षणांत स्वप्नांचा झाला चुराडा

SCROLL FOR NEXT