Golden Temple  
देश

Golden Temple : गोल्डन टेम्पलबाहेर तरुणाने गनमॅनकडून बंदुक हिसकावली अन्... घडलेल्या प्रकार पाहूण तुम्हीही हादराल

Golden Temple Premises Shooting : अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाला उपचारासाठी तात्काळ श्री गुरू नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिस या घटनेचा तपास करत असून मृत तरुणाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसाक तरुणाने मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या व्हीआयपी व्यक्तीच्या गनमॅनची बंदुक हिसाकवून घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार व्हीआयपी व्यक्ती आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी आले होते. व्हीआयपी जेव्हा मंदिरात गेले तेव्हा त्यांचे सुरक्षारक्षक बाहेर उभे होते. यादरम्यान एक तरुण तेथे आला आणि त्याने गनमॅनकडूल पिस्तुल हिसकावून घेतली आणि स्वतः वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून एकच खळबळ उडाली. एकदम गोल्डन टेम्पलच्या समोर या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने लोकांमध्ये भीती पसरली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतःवर गोळी झाडणारा हा व्यक्ती प्रवासी होता. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पडलेली नाहीये. पोलिसा चोकशी करत आहेत की हा तरुण नेमका कुठून आला. सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अमृतसरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT