Narendra Modi 
देश

Narendra Modi : युवक तेव्हाच मत देतात जेव्हा त्यांना...; गुजरात विजयानंतर मोदींकडून आभार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - बहुचर्चित गुजरात विधानसभा आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन केलं. तर गुजरातमध्ये भाजपने सत्ता कायम राखत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे आभार मानले. Narendra Modi news in Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हिमाचल प्रदेशात दर निवडणुकीत सत्तांतराची परंपरा आहे. मात्र आजपर्यंत कधीही पराभूत पक्षाचा केवळ एक टक्का मतांच्या फरकाने पराभव झाला नव्हता. जरी हिमाचलमध्ये पराभव झाला असला तरी तेथील विकासासाठी शतप्रतिशत काम करू असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिलं.

पंतप्रधान मोदी पुढं म्हणाले की, कोरोना महामारीनंतर बिहारमध्ये निवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपला जनतेने भरभरून मते दिली. त्यानंतर मणिपूर, गोवा, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा दिला. जेव्हा देशासमोर आव्हान उभे राहाते तेव्हा जनता भाजपच्या पाठिशी उभी असते.

दरम्यान तरुणवर्ग तेव्हाच मतदान करतो, जेव्हा त्याला विश्वास असतो. तरुणांनी भाजपला मतदान केलं. त्याचा भाजपवर विश्वास निर्माण झाला. आदिवासी समूदाय भाजपला आपला पक्ष मानतात. ४० पैकी ३४ राखीव जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. भाजपनेच देशाला पहिल्या आदिवासी राष्ट्रपती दिल्या. भारतातील गरिबी घटत असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT