देश

Ban Ind vs Pak:भाजपचं आंदोलन अन् नेटिझन्सची भारत - पाकिस्तान सामने ban करण्याची मागणी.. काय आहे प्रकरण घ्या जाणून

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बॅन करावा अशी मागणी केली.

Manoj Bhalerao

Ban India vs Pakistan:सध्या जम्मू काश्मिरच्या अनेक भागांमध्ये भारतीय सुरक्ष दल आणि आतंकवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यामध्ये भारताच्या जवांनांना जीव गमवावा लागला आहे. बुधवारी अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि डीएसपी हुमायून भट यांचा मृत्यू झाल्यानंतर भाजपच्या युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) जम्मूमध्ये पाकिस्तानविरोधी निदर्शने केली.

आंदोलनकर्त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि दहशतवाद आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीही केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बॅन करण्यात यावा अशी मागणी केली.

जम्मू-काश्मिरमध्ये वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत. पाकिस्तान सोबतचे सर्व व्यापारी आणि क्रिकेटचे संबंध तोडून टाकावेत, असे वक्तव्य एका नेटकऱ्याने केले. तर दुसरा नेटकरी म्हणाला की,“ जे लोक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वकिली करत होते, त्यांना पाकिस्तानची कृती हेचं उत्तर आहे. ”

काल रात्रीही अशीच निदर्शने करण्यात आली

सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमधील एका इमारतीत लपलेल्या दोन लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना वेढा घातला जिथे एका दिवसापूर्वी झालेल्या चकमकीत तीन सुरक्षा अधिकारी शहीद झाले होते.(Latest Marathi News)

माध्यमांच्या अहवालानुसार, हे दहशतवादी नेपाळमार्गे खोऱ्यात घुसले असून काश्मिर खोऱ्यात शांतता भंग करुन दहशदवादाला प्रोत्साहन देणे हा त्यांचा उद्देश आहे.

बुधवारी पहाटे अनंतनाग जिल्ह्यातील गरोल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत १९ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनॅक आणि उपअधीक्षक हुमायून भट गंभीर जखमी झाले.

अधिका-यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका जवानाचाही मृत्यू झाला. दुसर्‍या सैनिकाचा ठावठिकाणा कळू शकला नाही आणि तो गंभीर जखमी झाला असावा अशी भीती व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT