youths throw dogs on road video viral at haryana
youths throw dogs on road video viral at haryana 
देश

युवकांकडून श्वानावर अत्याचार; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था

चरखी दादरी (हरियाणा): एका युवकाने श्वानाच्या मागील दोन्ही पायांना पकडून गरागरा फिरून जोरात फेकून दिले. यावेळी श्वान विव्हळत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्राणी मित्र संघटनेने कारवाईची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुक्या प्राण्यांना अमानुषपणे वागणूक दिल्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. केरळमध्ये गर्भवती हत्तीणीसोबत घडलेल्या प्रकारानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. काही श्वानांना विष देऊन मारल्याचा प्रकार उघडकीस आले होते. आता श्वानाचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही युवक एकत्र आले आहेत. एका युवकाने श्वानाला प्रथम दोन पायांवर चालवण्याचा खेळ केला. यानंतर गरागरा फिरवत असताना श्वान विव्हळत आहे. शिवाय, गरागरा फिरवल्यानंतर त्याला रस्त्यावर फेकून दिले. यावेळी उपस्थित असलेले युवक आनंद घेत असल्याचा आवाज ऐकू येत आहे. पण, या युवकाला कोणीच थांबवण्यासाठी पुढाकार घेत नाही.

दरम्यान, या युवकांनी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पेटा संस्थेने या तीन युवकांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवाय, तिघांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पोलिसांना केली आहे. पोलिस व्हिडिओमधील युवकांचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT