YS Sharmila sakal
देश

YS Sharmila : ‘वाय.एस. शर्मिला काँग्रेसमध्ये; राहुल पंतप्रधान व्हावेत हे वायएसआर यांचे स्वप्न

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या आणि वायएसआर तेलंगण पक्षाच्या संस्थापक वाय.एस. शर्मिला यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

पीटीआय

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या आणि वायएसआर तेलंगण पक्षाच्या संस्थापक वाय.एस. शर्मिला यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी वायएसआर तेलंगण पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केल्याची घोषणा केली.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांची बहिण शर्मिला यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. शर्मिला यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आंध्र प्रदेशातील काँग्रेस पक्षाला बळकटी मिळेल, असे खर्गे म्हणाले.

यावेळी शर्मिला यांनी वायएसआर तेलंगण पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होत असल्याचे जाहीर केले. त्या म्हणाल्या, राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे, असे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. काँग्रेस पक्षासाठी काम करताना मला आनंद वाटत आहे. आपण ख्रिश्‍चन असल्यानात्याने मणिपूरमधील हिंसाचाराने व्यथित झाले आहे. सत्तेत धर्मनिरपेक्ष पक्ष नसेल तर असेच घडणार, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि हा पक्ष सर्व समुदायाची सेवा करतो आणि सर्व घटकांना एकत्र करण्याचे काम करतो. वायएसआर तेलंगण पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करताना मला आनंद होत आहे. आपल्या वडिलांनी केवळ काँग्रेसचीच सेवा केली नाही तर आपले जीवनही समर्पित केले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत असून हे पाहून आपल्या वडिलांना आनंद होत असेल, असेही शर्मिला म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT