From zero India now produces around 2 lakh PPE kits per day 
देश

Coronavirus : भारतात एकही पीपीई किट तयार होत नव्हती; आता तयार होतात तब्बल एवढ्या किट्स

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पीपीई किट्सचे भारतात आधी उत्पादन होत नव्हते. पण, दोन महिन्यांच्या आत भारतीय कंपन्यांनी अशक्य वाटणारे हे लक्ष्य साध्य करुन दाखवले आहे. भारतात आता दिवसाला २.०६ लाख किट्सची निर्मिती होत आहे.

०२ मेला देशात सर्वाधिक २.०६ लाख पीपीई किट्सचे उत्पादन करण्यात आले. पीपीई किट्सचे दिवसाला सरासरी उत्पादनाचे प्रमाण १.०५ लाख आहे. पीपीई किट्समध्ये मास्क, डोळयाचे सुरक्षा करणारी आय शिल्ड, बुटांचे शूज कव्हर, गाऊन आणि ग्लोव्हज यांचा समावेश होतो. COVID-19च्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी हा किट परिधान करतात. कोरोनाची लागण होऊ नये यासाठी ही किट महत्वाची आहे.

चौथ्यांदा वाढलं लॉकडाऊन; 'या' सरकारचा २९ मेपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय

देशांतर्गत पीपीई किट्सचे उत्पादन वेगात चालू आहे. यापूर्वी देशांतर्गत उत्पादन होत नसल्यामुळे हे किट्स बाहेरुन आयात करावे लागत होते, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, कोरोना व्हायरस विरुद्धच्या या लढाईत विविध वैद्यकीय उपकरणांचीही गरज आहे. या उपकरणांच्या निर्मितीमध्ये भारतीय कंपन्याही मागे नाहीत हे यातून स्पष्ट झाले आहे. करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना सुरक्षेच्या दृष्टीने पीपीई किट्स अत्यंत महत्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारी घटना, आई-वडिलांच्या डोळ्यादेखत घेतला अखेरचा श्वास!

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये उष्णतेचा कहर; ४२°C पार तापमानामुळे छोट्या व्यवसायिकांवर मोठा परिणाम

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

SCROLL FOR NEXT