

Mumbai Heat Wave
ESakal
मुंबई : संपूर्ण मुंबई उपनगरात 'ऑक्टोबर हिट'चे चटके सहन करावे लागत आहेत. हवेतील वाढलेली आर्द्रता आणि सूर्याच्या आगडोंबामुळे उपनगरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ३८.२ अंश, तर शहरात ३६.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. एकीकडे उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना दुसरीकडे आर्द्रता प्रचंड वाढल्याने आणखी हाल झाले.