zharkhand Ranchi man celebrates daughter sakshi gupta return after divorce husband said another story  
देश

"मानसिक त्रास द्यायची, 1.15 कोटी मागितले", वाचा बॅन्ड बाजा घटस्फोट मधील नवऱ्याची दुसरी बाजू

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- झारखंडची राजधानी रांचीमध्ये राहणाऱ्या प्रेम गुप्ता यांनी त्यांच्या मुलीचं घटस्फोटानंतर जल्लोषात स्वागत केलं होतं. प्रेम गुप्ता यांचं सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं. साक्षी गुप्ता या आपल्या पतीपासून वेगळं होऊन माहेरी परत आल्या होत्या. त्यांनी दावा केला होता की, पती सचिन कुमार यांनी त्यांना त्रास दिला. घरात डांबून ठेवलं. शिवाय आधीच सचिन यांचे दोन लग्न झाले होते. वयाच्या बाबतही त्यांना खोटं बोलण्यात आलं.

साक्षी यांच्याकडून सांगण्यात आलेल्या कथनातून त्यांना सहानभूती मिळू लागली होती. अनेक न्यूज चॅनेलवर त्यांनी प्रतिक्रिया देत आपबिती सांगितली होती. पण, आता साक्षी यांचा पती सचिन कुमार यांनी समोर येऊन वेगळीच बाजू मांडली आहे. साक्षी गुप्ता यांनी केलेले दावे सचिन कुमार यांनी साफ फेटाळून लावले आहेत.

सचिन कुमार काय म्हणाले?

माझ्या कुटुंबियांना विनाकारण टार्गेट करण्यात आलंय. साक्षी गुप्ताने विविध चॅनेलवर जाऊन माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी केली. आम्ही वन टाईम सेटलमेंट कोर्टात जाऊन केलं होतं. त्यामुळे तेथेच हे प्रकरण मिटलं होतं. पण, मोठ्या जल्लोषात हे साजरे करण्याचे आणि पुन्हा मीडियासमोर येण्याचे कारण मला जमजू शकलं नाही, असं सचिन म्हणाले.

मी सुरुवातील या गोष्टी दुर्लक्ष केल्या. कारण, मला वाटलं हे एक-दोन दिवस चालेल, नंतर सर्व शांत होईल. पण, साक्षी गुप्ता आणि त्यांचे कुटुंबीय माझी बदनामी सर्वत्र करत सुटले आहेत. ही गोष्ट थांबायची चिन्ह नसल्याने मी समोर येऊन बोलण्याचं ठरवलं, असं ते म्हणाले.

पत्नीकडून मानसिक त्रास

28 एप्रिल २०२२ मध्ये माझे लग्न झालं होतं. लग्नानंतर साक्षी मला मानसिक त्रास द्यायची. घरच्यांना मला भेटू द्यायची नाही. तिचं डॉमिनेटिंग नेचर होतं. मी दोन्ही कुटुंबियांना एकत्र आणून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु पाहिला. पण, तिच्या स्वभावात काही फरक पडला नाही. तिची माझ्या आई-वडिलांना सोडून वेगळे राहण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही स्वत:चं घर सोडून भाड्याच्या घरी राहू लागलो, असं ते म्हणाले.

काही काळाने मला खूप मानसिक त्रास होऊ लागला होता. तिच्यासोबत राहणं असह्य झालं. साक्षी एका कार्यक्रमासाठी माहेरी गेल्याने ते भाड्याने घेतलेले घर मी सोडलं आणि दुसरीकडे भाड्याने घर घेऊन राहू लागलो. त्यावेळी साक्षी आणि तिचे कुटुंबीय माझ्या आई-वडिलांच्या घरी जाऊन त्यांना धमकावू लागले. त्यानंतर आम्ही पोलिसांत गेलो, पोलिसांनी कोर्टात जाण्याचा सल्ला दिला, असं ते म्हणाले.

साक्षीकडून कुटुंबियांना त्रास

साक्षीने माझ्या आणि माझ्या कुटुंबियांविरोधात क्रिमिनल केस केली. त्यानंतर मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.यावेळी साक्षीने माझ्याकडे सेटलमेंटसाठी १.१५ कोटी रुपये मागितले. मला इतके पैसे देणं शक्य नव्हते. त्यानंतर ती माझ्या आई-वडिलांना घरी जाऊन जबरदस्ती राहु लागली. त्यांना त्रास देऊ लागली. कंटाळून मी वन टाईम सेटलमेंट केलं. चार टप्प्यांमध्ये पैसे देण्याचं ठरलं. दोन टप्प्यात पैसे दिल्यानंतर चार दिवसांनी तिनं माझं घर सोडलं, असं सचिन म्हणाले. यावेळी सचिन यांनी सेटलमेंटसाठी किती पैसे दिलं हे सांगितलं नाही.

खोटं बोलून लग्न करण्यात आले असं साक्षी दावा करत आहे. माझे दोन लग्न झाल्याचं साक्षी म्हणते, पण हे खोटं आहे. मी एक सरकारी कर्मचारी आहे. त्यामुळे माझ्याबाबतची सर्व माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहे. मी खोटं बोललो असतो तर माझी नोकरी गेली असती. त्यामुळे मी काहीही लपवलं नाही, असं सचिन म्हणाले.

जेवण झोमॅटोवरुन

साक्षी दुपारी एक-दोन वाजता उठायची. जेवण बाहेरुन मागवण्याचा हट्ट धरायची. तिने माझ्या ११ कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पण, कोर्टाने साक्षीने केलेले दावे फेटाळले होते. त्यामुळे कोर्टाने माझ्याविरोधात काही कारवाई केलेली नाही, तर मग मला दोषी का ठरवलं जातंय, असा सवाल त्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT