zomato co founder gunjan patidar resigned from company  
देश

Zomato News Update : झोमॅटोचे सह-संस्थापक गुंजन पाटीदार यांचा राजीनामा, कंपनी म्हणते…

सकाळ डिजिटल टीम

Gunjan Patidar Co-Founder Zomato Resigned : ऑनलाइन फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म झोमॅटो लिमिटेडचे ​​सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) गुंजन पाटीदार यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कंपनीने शेअर मार्केटला दिलेल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की पाटीदार हे झोमॅटोच्या पहिल्या काही कर्मचाऱ्यांपैकी एक होते आणि त्यांनी कंपनीसाठी मुख्य तंत्रज्ञान प्रणाली तयार केली होती.

झोमॅटोने सांगितले की, "कंपनीला पुढे नेण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे." तथापि, कंपनीने त्यांच्या राजीनाम्याचे कारण सांगितलेले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीचे आणखी एक सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी राजीनामा दिला होता. गुप्ता साडेचार वर्षांपूर्वी झोमॅटोमध्ये सामील झाले होते. 2020 मध्ये कंपनीच्या फूड डिलीव्हरी व्यवसायाच्या सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) पदावरून पदोन्नती देऊन त्यांना सह-संस्थापक बनवण्यात आले होते.

सध्यातरी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. एकामागून एक सह-संस्थापक कंपनीला बाय-बाय म्हणत आहेत. एकीकडे कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात वाईट काळातून जात असताना, दुसरीकडे अशा बातम्या समोर येत आहेत. याआधी झोमॅटोचे आणखी एक सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी नोव्हेंबरमध्ये कंपनी सोडली होती, त्यानंतर आता गुंजन पाटीदार यांनीही राजीनामा दिला आहे. यामुळे कंपनीच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT