Zomato Delivery Boy News Zomato Delivery Boy News
देश

Video Viral : झोमॅटो डिलिव्हरी बॉयला चप्पलने मारहाण; महिलेवर कारवाईची मागणी

क्लिपमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय शांतपणे उभा असलेला दिसत आहे

सकाळ डिजिटल टीम

Zomato Delivery Boy News नवी दिल्ली : महिलेने झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉयला (Zomato Delivery Boy) चप्पलने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलगा ऑर्डर देण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओवर लोकांनी महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. क्लिपमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय शांतपणे उभा असलेला दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ १६ ऑगस्टचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ डीजे नावाच्या ट्विटर युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने दावा केला की ‘डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy) ऑर्डर घेऊन जात होता. हा व्हिडिओ एका जवळच्या व्यक्तीने रेकॉर्ड केली होती. डिलिव्हरी बॉयला नोकरी जाण्याची भीती आहे.’

युजरने ही घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख केलेला नाही. या व्हिडिओवर (Video Viral) लोक महिलेवर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एकाने झोमॅटो कस्टमर केअरला फोन करून महिलेवर कारवाई झाली आहे की नाही? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तसेच ही महिला अशी का वागली हे सुद्धा माहीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे अद्याप कळू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड अटकेत... २५ वर्षांपासून देशभरात चालवत होता रॅकेट, कोण आहे बिजेंद्र गुप्ता?

IND vs ZIM 2nd T20I: वैभव सुर्यवंशीची स्फोटक फलंदाजी आजही पाहायला मिळणार; भारत- झिम्बाब्वे दुसरा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

नवी पिढी प्रश्न विचारणारी, लॉजिक जाणून घेणारी; आदेशाऐवजी...; सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

Heavy Rain Effects: गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ कायम, आसाममध्ये गंभीर स्थिती, काश्‍मीरमध्येही हजेरी

SCROLL FOR NEXT