Viral News Esakal
देश

Viral News: एक्स बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी नको तो पराक्रम; शेवटी Zomato ही वैतागलं, ट्विट केलं 'अंकिता बस भी करो'

एक्स बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी गर्लफ्रेंडचा पराक्रम; Zomato ही वैतागलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

अलीकडच्या काळात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. सर्व कंपन्या त्यांच्या मार्केटिंगसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करतात. यासोबतच काही वेळा कंपन्या त्यांचे विचित्र अनुभव शेअर करत असतात. असंच एक प्रकरण आता चर्चेत आलं आहे. Zomatoने आलेला एक अनुभव ट्विटद्वारे शेअर केला आहे, यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे

घटना अशी आहे की, भोपाळमध्ये अंकिता नावाच्या मुलीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी एक मार्ग शोधला आहे. तिने झोमॅटोच्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपचा वापर करत बॉयफ्रेंडसह झोमॅटोलाही वैताग आणला आहे. घडलं असं, की अंकिता तिच्या एक्स बॉयफ्रेंडसाठी झोमॅटोवरून कॅश ऑन डिलिव्हरीवर वारंवार जेवण ऑर्डर करत होती. त्याचवेळी तिचा बॉयफ्रेंड प्रत्येक वेळी पैसे देण्यास आणि ते जेवण घेण्यास नकार देत असे. अशा परिस्थितीत वैतागलेल्या झोमॅटोने शेवटी ट्विटच केलं.

भोपाळच्या अंकिताला ट्विटद्वारे आवाहन करत, झोमॅटोने 2 ऑगस्टला ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये लिहिलं आहे की ‘भोपाळची अंकिता, आता बस करा. तुमच्या एक्स बॉयफ्रेंडसाठी कॅश ऑन डिलिव्हरीवर जेवण ऑर्डर करणं थांबवा. तुमच्या एक्सने आम्हाला पैसे देण्यास नकार दिल्याची ही तिसरी वेळ आहे’. झोमॅटो अनेकदा मनोरंजक पोस्ट करत असते.

अशा परिस्थितीत लोकांना प्रश्न पडला आहे, खरोखरच अंकिता नावाच्या मुलीने झोमॅटोला वैताग दिला आहे. की, मजा घेण्यासाठी त्यांनी स्वत:हून या पात्राची कल्पना केली आहे? प्रकरण काहीही असलं तरी झोमॅटोची ही अनोखी पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT