CHILD VACCINATION 
देश

Zydus Cadila ची लहान मुलांसाठी लस; DCGI कडे मागितली मंजुरी

कार्तिक पुजारी

कोरोनाविरोधातील लढ्यात भारताला आणखी एक प्रभावी शस्त्र मिळणार आहे. कारण, भारतातील १२ वर्षांपुढील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली- कोरोनाविरोधातील लढ्यात भारताला आणखी एक प्रभावी शस्त्र मिळणार आहे. कारण, भारतातील १२ वर्षांपुढील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगळुरुमधील झायडस कॅडिला कंपनीने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे डीसीजीआयला १२ वर्ष आणि त्यापुढील मुलांवरील आपल्या ZyCoV-D लशीच्या आपात्कालीन वापराच्या मंजुरीसाठी परवानगी मागितली आहे. डीसीजीआयने परवानगी दिल्यास भारताला आणखी एक लस मिळू शकते. डीएनएवर आधारित असणाऱ्या या लशीच्या तिन्ही टप्प्यातील चाचण्या पार पडल्या आहेत. त्यामुळे लशीला परवानगी मिळाल्यास लसीकरणाला वेग येऊ शकतो. (India Zydus Cadila Seeks Nod For Its Dose ZyCoVD Needle Free Vaccine)

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, झायडस कॅडेलाने डीसीजीआयला निवदेन दिले आहे. ज्यात डीएनए लस Zycov-D च्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. झायडस कॅडेलाची ही लस १२ वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी असणार आहे. कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा सादर केला आहे, ज्यात २८ हजारांपेक्षा अधिक वॉलिंटिअर्संनी भाग घेतला होता. रॉयटर्सच्या माहितीनुसार, झायडस कॅडिलाची लस सुरक्षित आणि प्रभावी आहे.

झायडस कॅडिलाच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीच्या डेटानुसार, Zycov-D ची लस १२ ते १८ वर्षांमधील मुलांसाठी प्रभावी आहे. कंपनीने दरवर्षी १० ते १२ कोटी लस निर्माण करण्याची तयारी केली आहे. कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोडा यांनी सांगितलं की, झायडस कॅडिलाच्या लशीची चाचणी जवळपास पूर्ण झाली आहे. जुलैच्या शेवटापर्यंत किंवा ऑगस्ट महिन्यात १२ ते १८ वर्षांमधील लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यास सुरु होईल. विशेष म्हणजे ही लस इंजेक्सच्या साहाय्याने दिली जात नाही.

दरम्यान, भारतात आतापर्यंत चार लशींच्या वापराला परवानगी मिळाली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन, रशियाची स्पुटनिक ५ आणि अमेरिकीची मॉडर्ना या लशींचा समावेश आहे. झायडस कॅडिलाच्या लशीला आपत्कालीन वापरास परवानगी मिळाल्यास ती पाचवी लस ठरु शकते. शिवाय यामुळे लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळू शकते. भारतात आतापर्यंत ३३ कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paris Knife Attack: पॅरिस हादरलं! गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूहल्ला; आरोपीचा धक्कादायक दावा, म्हटला "मला अल्लाहने पाठवलं"

PM Modi Video Meta Apology : गलतीसे मिस्टेक! PM मोदींचा व्हिडिओ भारतात ब्लॉक, मेटाने चूक कबूल करत मागितली माफी

Latest Live Updates Marathi : उजनी धरण १०० टक्के भरले, भीमा नदीत ६१,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना इशारा

Mumbai News: तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आहात, मग त्यांना मारहाण का करता? उच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंच्या नेत्याला फटकारले

'भेटली तू पुन्हा' च्या सिक्वेलची घोषणा! प्रेक्षक खुश, मुख्य भूमिकेत झळकणार 'हे' कलाकार

SCROLL FOR NEXT