देश

मुलांसाठी झायडस कॅडीला लस; जाणून घ्या डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

भारतात झायडस कॅडीला या ZyCoV-D लसीला डीसीजीआयने आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे.

भारतात झायडस कॅडीला या ZyCoV-D लसीला डीसीजीआयने आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. भारतात तयार झालेली मान्यता मिळालेली ही तिसरी लस आहे. तसंच कोरोनावर जगातील पहिलीच डीएनएवर आधारीत अशी ही लस आहे. 12 वर्षे वयावरील सर्वांना ही लस दिली जाईल. आतापर्यंत भारतात 6 कोरोना प्रतिबंधक लसींना परवानगी मिळाली आहे.

कंपनीने म्हटलं आहे की, वर्षाला दहा ते १२ कोटी डोस तयार करण्याचं कंपनीचं ध्येय आहे. तसंच लसीचा साठा करण्यासही सुरुवात केल्याचं सांगण्यात आलं आहे. झायडस कॅडीला ही लस कॅडीला हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने तयार केली असून परवानगीसाठी 1 जुलै रोजी अर्ज केला होता. सध्या या लसीची अंतिम टप्प्यात चाचणी सुरु आहे. देशभरात 28 हजार वॉलंटिअर्सनी यामध्ये भाग घेतला होता. ही लस 66.6 टक्के प्रभावी ठरली होती.

झायडस कॅडीला कोरोनाविरोधातील जगातील पहिलीच अशी लस आहे जी प्लास्मिड डीएनए लस आहे. झायडस कॅढीला लस बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटसोबत मिळून तयार करण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिननंतर भारतात तयार होणारी ही दुसरी लस आहे.

कंपनीने जुलैमध्ये अशी माहिती दिली होती की, त्यांची लस कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटवर प्रभावी आहे. विशेषत: धोकादायक समजल्या जाणाऱ्या डेल्टा व्हेरिअंटला रोखू शकते असा दावा करण्यात आला होता.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हेरिअंट कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जातं. ही लस नेहमीच्या सिरींजपेक्षा वेगळ्या अशा एप्लिकेटरच्या माध्यमातून देण्यात येईल. भारतात याआधी कोरोनावर सीरमची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, मॉ़डर्ना आणि जॉन्सनच्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Net Worth: जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! अडाणींची एका दिवसात 84,500 कोटींची कमाई; अंबानी किती नंबरवर?

Shahaji Raje Bhosale Samadhi : शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील समाधीवर बसवली भव्य ४५० किलोची मेघडंबरी; पुणेकराचे अभिमानास्पद कार्य

चिरंजीव ‘अश्वत्थामा’ची कथा आता रंगभूमीवर ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

पत्नी आवडत नाही म्हणून मित्रांना ५० हजारात विकली, पुढे १० दिवस मित्रांनी....; गुजरातमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन

SCROLL FOR NEXT