Piyush Jain Team eSakal
देश

"जप्त केलेले पैसे परत करा..."; अत्तर व्यापाऱ्याची कोर्टात धाव

अत्तर व्यापारी पियुष जैनकडून शेकडो कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

सुधीर काकडे

कर बुडवत शेकडो कोटी रुपयांचं घबाड जमा करणारा कानपुरमधील (Kanpur) अत्तर व्यापारी पियुष जैन (Piyush Jain) सध्या देशभरात चर्चेत आहे. त्यातच आता अटकेत असलेल्या पियुष जैनने जप्त केलेली माझी संपत्ती मला परत करा अशी मागणी केली आहे. या संदर्भात पियुष जैन यांच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. सध्या पियुष जैन १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत कानपूर तुरुंगात आहे.

जप्त केलेल्या माझ्या संपत्तीमधून 52 कोटी रुपयांचा कर वसूल करावा आणि उर्वरीत सर्व रक्कम परत करावी अशी मागणी पियुष जैनने न्यायालयाकडे केली आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्स (DGGI) ने 52 कोटी रुपयांचा कर कापून उर्वरित रक्कम मला परत करावी अशी मागणी केली आहे.

डीजीजीआयचे वकील अंबरीश टंडन यांनी बुधवारी सांगितले की त्यांच्या घरातून जप्त केलेली रक्कम ही करचोरीची रक्कम आहे. वसूल केलेली रक्कम 42 बॉक्समध्ये ठेवून बँकेत जमा करण्यात आली आहे. टंडन यांनी सांगितले की, कानपूरमध्ये 177 कोटी 45 ​​लाख रुपये वसूल केले गेले आहेत जे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दोनदा जमा करण्यात आले आहेत. पहिल्यांदा 25 पेट्यांमध्ये 109 कोटी 34 लाख 74 हजार 240 रुपये, तर दुसऱ्यांदा 17 पेट्यांमध्ये 68 कोटी 10 लाख 27 हजार रुपयांची रक्कम बँकेत पाठवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT