Shrinagar Yasir Malik 
देश

यासिन मलिकच्या समर्थकांकडून श्रीनगरमध्ये जाळपोळ, दगडफेक

टेरर फंडिंग प्रकरणी काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिक याला काही वेळातच विशेष एनआयए कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : टेरर फंडिंग प्रकरणी काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिक याला काही वेळातच विशेष एनआयए कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात येणार आहे. एनआयएनं त्याच्या फाशीची मागणी केली आहे. त्यामुळं कोर्ट काय शिक्षा देतंय याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, मलिकचं निवासस्थान असलेल्या श्रीनगरमध्ये त्याच्या समर्थक आक्रमक झाले असून त्यांच्याकडून दगडफेक करण्यात येत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांकडून इथं अश्रुधुरांचा मारा करण्यात येत आहे. (Stone pelting in Srinagar by Yasin Malik supporters attempts by police for control)

यासिन मलिकच्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर बंदची हाक देण्यात आली असून शहरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. श्रीनगरच्या प्रमुख लाल चौकात मलिकच्या समर्थकांकडून जाळपोळ आणि दगडफेक करण्यात येत आहे. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलीस आणि लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी इथं अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

दरम्यान, यासिन मलिक याच्या घरामध्येही प्रचंड तणावाचे वातावरण असून त्याचे शेजारी आणि नातेवाईकांनी घरी गर्दी केली आहे. मलिकच्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या बहिणीने तर कुराण पठण सुरु केलं असून घराच्या खिडकीमध्ये उभी राहून ती कुराणचं पठण करत असल्याचं काही छायाचित्रांमधून समोर आलं आहे.

नवी दिल्लीच्या पटियाला कोर्टाबाहेर देखील मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बराच वेळापासून निकालाचं लिखाण सुरु असून कोणत्याही क्षणी मलिकच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT