10th & 12th Board Preparation know how to make effective study time table 10th & 12th Board Preparation know how to make effective study time table  
एज्युकेशन जॉब्स

10th & 12th Board Preparation: विद्यार्थ्यांनो, तयार करा अभ्यासाचा प्रभावी टाइम टेबल; या आहेत टिप्स 

अथर्व महांकाळ

नागपूर : दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ येत आहेत. वर्षभर काही प्रमाणात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा वेग आता वाढू लागला आहे. मात्र परीक्षेला काही दिवस उरले असताना दररोज सर्वच विषयांचा अभ्यास करणे शक्य होऊ शकत नाही. यासाठी अभ्यासाचा एक प्रभावी टाइम टेबल तयार करणे आवश्यक असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना सहजपणे वेळेचे नियोजन करून सर्व विषयांचा अभ्यास करता येईल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला प्रभावी टाइम टेबल कसा तयार करावा याबद्दलच्या काही टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.      

असा तयार करा नियोजनबद्ध टाइम टेबल :- 

महत्वाच्या वाटणाऱ्या विषयांची यादी बनवा 

जर तुम्हाला एक प्रभावी असा अभ्यासाचा टाइम टेबल तयार करायचा असेल तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या विषयांची यादी. तुम्हाला कोणते विषय आहेत किंवा कोणते कोर्सेस आहेत यांची संपूर्ण यादी तुमच्याकडे असणे महत्वाचे आहे. यादीप्रमाणे जे विषय तुम्हाला कठीण वाटतात अशा विषयांना सुरवातीला प्राधान्य द्या. ज्या विषयांमध्ये तुमचा हातखंडा आहे ते विषय शेवटी टाइम टेबलमध्ये लिहा. ज्या विषयांची परीक्षा सुरुवातीला होणार आहे अशा विषयांचा अभ्यास आधी करा. विषयांची यादी तयार केल्यामुळे तुम्हाला टाइम टेबल तयार करण्यास मदत होईल. 

प्रत्येक विषयावर लक्ष द्या 

अभ्यासाचा टाइम टेबल तयार करताना यादी बनवण्यासोबतच प्रत्येक विषयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. टाइम टेबल तयार करताना प्रत्येक विषय महत्वाचा आहे असे समजून अभ्यास करा. जो विषय तुम्हाला अधिक कठीण वाटतो त्या विषयाला अधिक वेळ नेमून द्या. तर सोपी विषयासाठी कमी वेळ द्या. गरजेनुसार उंची टाइम टेबलमध्ये बदल करत राहा. ज्या विषयाचा अभ्यास झाल्यासारखा वाटत नाहीये असा विषय टाइम टेबलमध्ये वारंवार घ्या. 

अभ्यासाच्या वेळा निश्चित करा 

अभ्यासाचा टाइम टेबल तयार करण्याचा प्रयत्न करताना तुमचा दिवसभरातील वेळ काही टप्प्यांमध्ये वाटून घ्या. तसेच अभ्यासाच्या वेळा ठरवून घ्या. ज्यामुळे आपल्याला दररोज त्याच वेळी अभ्यास करण्यास बसता येईल. यामुळे वेळापत्रक नियमितपणे न तपासता लक्षात ठेवणे सोपे होईल. तसेच नियमित ठरलेला दिनक्रम अंगीकारल्यामुळे तुमच्यात अभ्यासाची मानसिकता निर्माण होईल. यामुळे तुमच्यामध्ये अभ्यासाची सकारात्मक सवय विकसित होण्यास मदत होईल. 

अभ्यास टप्प्यांमध्ये वाटून घ्या 

विषयांची यादी, नियोजन आणि अभ्यासाची वेळ निश्चित झाल्यावर महत्वाचे काम म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या वेळा काही टप्प्यांमध्ये वाटून घ्या. टाइम टेबलमध्ये दररोज या वेळांची नोंद करत राहा. कोणत्या टप्प्यात तुम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहात हे सुनिश्चित करून घ्या. यामुळे तुम्ही विषयानुसार वेळेचे नियोजन करू शकाल. त्याचप्रमाणे तुम्ही किती वेळात कुठल्या विषयाचा अभ्यास केला हे लक्षात ठेवण्यास मदत होईल. टाइम टेबलमध्ये या सर्व बाबी अवश्य लिहून ठेवा. 

टाइम टेबल काटेकोरपणे पाळा 

अभ्यासाचा टाइम टेबल तयार करणे हे सोपे काम असू शकते मात्र त्या टाइम टेबलचे पालन करणे हे काम सर्वात कठीण आहे. अनेकजण काही दिवस टाइम टेबलचे पालन केल्यानंतर अपयशी ठरतात. मात्र तुम्ही तयार केलेल्या टाइम टेबलचे काटेकोरपणे पालन करणे ही जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे टाइम टेबलमध्ये स्वतःसाठी अभ्यासाव्यतिरिक्त वेळ राखून ठेवा. या वेळात खेळणे, टीव्ही बघणे अशा प्रकारची कामे तुम्ही करू शकता. वेळेचे नियोजन करून टाइम टेबल तयार करा. ज्यामुळे तुम्हाला अभ्यासात गोडी निर्माण होईल. तसेच तुमचा टाइम टेबल पाळण्यास मदत होईल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palava Flyover: सात वर्षे बांधकाम, ७२ कोटी खर्च... पण ७ महिनेही महत्वाचा उड्डाणपूल टिकला नाही, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Pali Crime : पालीत बनावट पोलिसांची दहशत; वृद्ध महिलेला फसवून पन्नास हजारांचे दागिने लंपास, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Updates : खरीप हंगाम पूर्ण वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात

Duleep Trophy Final: विदर्भाच्या यशचं द्विशतक फक्त ६ धावांनी हुकलं, पण रजत पाटिकरच्या संघाने सामन्यावर मिळवली मजबूत पकड

"एका व्हॅनमध्ये साहेब विवस्त्र बसलेले असतात आणि..." बॉलिवूड दिग्दर्शकाने केली कलाकारांची पोलखोल, म्हणाला

SCROLL FOR NEXT