11th admission
11th admission sakal
एज्युकेशन जॉब्स

अकरावीच्या पुढील टप्प्याची प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे!

मीनाक्षी गुरव -@GMinakshi_sakal

पुणे : दहावीच्या परीक्षेच्या निकालानंतर इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा कधी सुरू होणार, याची तुम्हाला प्रतीक्षा असेल! तर, इकडे लक्ष द्या. येत्या आठवड्यात सोमवारी (ता.४) किंवा मंगळवारी (ता.५) प्रवेशाचा पुढील टप्पा म्हणजेच महाविद्यालयाचा पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा सूतोवाच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केला आहे. राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागून १५ दिवस उलटले तरीही अद्याप इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा जाहीर न झाल्याने हतबल झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवस उशिराने म्हणजे मार्च-एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षा उशिरा होऊनही निकाल मात्र वेळेत लावण्यात राज्य मंडळाला यश आले. परंतु दहावीचा निकाल जाहीर होण्याआधी म्हणजेच ३० मे पासून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (महापालिका क्षेत्रांसाठी) सुरू झाली. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भाग एक भरण्याची सुविधा खुली करून देण्यात आली. त्याचदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीही सुरू झाली. परंतु अद्याप देखील महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया अपूर्ण आहे.

परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पुढील टप्प्याची म्हणजेच पहिल्या नियमित फेरीसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम देण्याची सुविधा अद्यापही ‘लॉक’ आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती महापालिकेच्या हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेशाकरिता ही केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

विभागीय उपसंचालकांचे आवाहन

‘‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांतील आसन क्षमता तपासण्यात आलेली आहे. त्याचा तपशील ‘https://pune.11thadmission.org.in/’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. प्रत्यक्ष तपासणीत आढळलेल्या बैठक क्षमतेनुसार विद्यार्थीसंख्या निश्चित केली आहे. त्यासंदर्भात हरकती व सूचना असल्यास शनिवारी (ता.२) दुपारी बारा वाजेपर्यंत ‘11thonlineadmissiondydpune@gmail.com’ या ई-मेलवर पाठवाव्यात. दिलेल्या कालावधीत हरकती व सूचना प्राप्त न झाल्यास बैठक क्षमतेनुसार विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात येईल’’, असे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी स्पष्ट केले आहे.

‘‘प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांनी तुकड्या वाढविण्याची मागणी केली होती. परंतु वाढविलेल्या तुकड्या आणि जागा याप्रमाणे महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष भौतिक सुविधा आहेत की नाही, याची तपासणी १३ जूनपासून शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. ही तपासणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (ता.४) किंवा मंगळवारी (ता.५) प्रवेशाचा पुढील टप्पा सुरू होईल.’’

- महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय

अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालये

महापालिका क्षेत्र : नोंदणी केलेले : लॉक केलेले अर्ज : नोंदणी केलेली कनिष्ठ महाविद्यालये

पुणे-पिंपरी चिंचवड : ८५,०८३ : ५८,९६० : ३०१

मुंबई : २,५९,५०३ : २,०२,७७८ : १,००९

नागपूर : २७,६४३ : २०,९१९ : १९१

नाशिक : २३,४८९ : १८,५०१ : ६२

अमरावती : ९,२९० : ७,६६४ : ६६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT