HSC Result 2024 esakal
एज्युकेशन जॉब्स

HSC Result 2024: बारावीच्या निकालात मुलींचा डंका, कोकणातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण, जाणून घ्या संपूर्ण निकाल

12th Maharashtra Board Result 2024: महाराष्ट्रातून यंदा बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

HSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा राज्यात तब्बल ९३.३७ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. बारावीच्या निकालात यंदा ही मुलींनी बाजी मारली आहे.

यावर्षी बारावीची परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये पार पडली. महाराष्ट्रातून यंदा बारावीची परीक्षा तब्बल १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यात कोकण विभागातील ९७.५१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा ९१.९५ टक्के असा लागला आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.४४ टक्के इतकी आहे.

यंदा मुलांपेक्षा 3.८४ टक्क्यांनी जास्त मुलींची टक्केवारी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी एकूण १४ लाख ३३ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्व विभागीय मंडळांतून ९५.४४ टक्के (नियमित) विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून ९१.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ३.८४ टक्क्यांनी जास्त आहे. एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४५,४४८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५,०८३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी २२,४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४९.८२ आहे.

या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७०३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९८६ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ६५८१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९४.२० आहे.

खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४१,३६२ एवढी असून त्यापैकी ४०,७९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, ३४,९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ आहे. या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

९ विभागीय मंडळांचा निकाल :

  • पुणे - ९४.४४

  • नागपूर - ९२.१२

  • छत्रपती संभाजीनगर - ९४.०८

  • मुंबई - ९१.९५

  • कोल्हापूर - ९४.२४

  • अमरावती - ९३.००

  • नाशिक - ९४.७१

  • लातूर - ९२.३६

  • कोकण - ९७.५१

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT