Scholarship Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

Scholarship Exam : 'शिष्यवृत्ती'कडे 51 हजार विद्यार्थ्यांची पाठ, तर 31 हजारहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (Scholarship Exam) जिल्ह्यातून ३१ हजार ६०३ विद्यार्थी (Students) बसणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवीसाठी होती.

सांगली : शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (Scholarship Exam) जिल्ह्यातून ३१ हजार ६०३ विद्यार्थी (Students) बसणार आहेत. यामध्ये पूर्व उच्च प्राथमिकचे (पाचवी) १९ हजार १३४ व पूर्व माध्यमिकचे (आठवी) १२ हजार ४६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेसाठी केवळ ३८ टक्के नोंदणी झाली आहे. रविवारी (ता. १८) होणार आहे. जिल्ह्यात ८३ हजार विद्यार्थी संख्या असून ५१ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरविली आहे.

जिल्ह्यातील २१२ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षेला बसण्याची संख्या वाढत आहे. त्याचा एक साधारण अनुभव शालेय वयातच यावा, यासाठी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवण्याकडे पालकांचा कल असतो.

मात्र यंदाच्या परीक्षेला निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवीसाठी होती. मात्र काही वर्षांपासून यात बदल करून ती पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात येत आहे. यामध्ये गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी ६० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.

विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी. त्यांना बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे अचूक देता यावीत, यासाठी त्यांच्यात बौद्धिक गुणवत्ता वाढावी, कौशल्य वाढावे, हा याचा उद्देश आहे. या वर्षीची परीक्षा राज्यभरात रविवारी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पूर्व उच्च प्राथमिकच्या १९ हजार १३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांची १३० परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पूर्व माध्यमिकच्या परीक्षेसाठी १२ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांची परीक्षा ८२ केंद्रांवर होणार आहे. जिल्ह्यातील पाचवी आणि आठवीचे एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे.

आठवीची ४३ हजार ६२४ विद्यार्थी संख्या

दरम्यान, जिल्ह्यात पाचवीचे ३९ हजार ४३१ विद्यार्थी आहेत. मात्र परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४८ टक्के आहे. आठवीची ४३ हजार ६२४ विद्यार्थी संख्या आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २९ टक्के इतकीच आहे. दोन्ही परीक्षांसाठी जिल्ह्यातून केवळ ३१ हजार ६९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. म्हणजेच सुमारे ५१ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरविली आहे. या दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढवायची असेल तर शिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT