33 lakh students do not have Aadhaar card Defective Aadhaar Card in Pune  sakal
एज्युकेशन जॉब्स

३३ लाख विद्यार्थी विना ‘आधार कार्ड’; पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सदोष आधार कार्ड

शासनातर्फे शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येतात.

प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि. वर्धा) : शासनातर्फे शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. असे असतानाही राज्यात तब्बल ३३ लाख २५ हजार ४७५ विद्यार्थ्यांजवळ आधार कार्ड नसल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या २४ लाख ६८ हजार ५०९ तर विदर्भातील ६ लाख ३० हजार ५०७ विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. यात राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात २ लाख ४८ लाख ४०७ विद्यार्थ्यांच्या कार्डमध्ये त्रुटी आहे. तर विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील १ लाख ६३ हजार ६४४ कार्डात त्रुटी आहेत.

शिक्षण विभागाच्या माहितीनुसार राज्यात एकूण २ कोटी २१ लाख ३१ हजार ४७२ विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंद आहे. त्यापैकी १ कोटी १८ लाख ५ हजार ९९७ विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आहे. तर ३३ लाख २५ हजार ४७५ विद्यार्थ्यांची आधार नोंदणी नाही. तर १ कोटी १० लाख ५८ हजार ५६५ विद्यार्थ्यांची आधार पडताळणी सुरू आहे. राज्यात एकूण ८५ लाख ९० हजार ५६ विद्यार्थ्यांचे आधार वैध असून २४ लाख ६८ हजार ५०९ विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये त्रुटी आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजना पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी संचालनालयाने आधार कार्ड अपडेट करण्याबाबत कळविले आहे.

आधारकार्डची सद्य:स्थिती

  • २ कोटी २१ लाख ३१ हजार ४७२ - एकूण विद्यार्थी

  • ३३ लाख २५ हजार -आधार नसलेले

  • १ कोटी १८ लाख ५ हजार ९९७ - आधारकार्डधारक

  • १ कोटी १८ लाख ५ हजार ९९७ - पडताळणी सुरू असलेले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT