Job News esakal
एज्युकेशन जॉब्स

कुठलीही पदवी नसेल तरी ६१ लाख पगाराची नोकरी, 'या' क्षेत्रात संधी

सकाळ डिजिटल टीम

योग्य शिक्षण आणि पदवी नसेल तर चांगल्या पगाराची नोकरी (Jobs) लागेल असा विचारही आपण करू शकत नाही. पण, तुम्हाला शिक्षण न घेता चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, कुठलीही पदवी नसताना तुम्हाला आता ६१ लाख रुपये पगाराची नोकरी मिळविता येईल. त्याबाबत एका तज्ज्ञाने माहिती दिली आहे.

एलेनी पवलोविक (२४) या तज्ज्ञ व्यवस्थापक असून मार्केटींग, ऑपरेशन्स, फायनान्स आणि डेटा-प्रोडक्टमधील विशेषतज्ज्ञ आहेत. त्यांनी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना प्रोडक्ट डेटा अॅनालिस्टमध्ये करिअर करण्याची शिफारस केली आहे. कारण टेक कंपनीमधील हा नवीन जॉब असून यासाठी त्यांना खूप मनुष्यबळ लागणार आहे. तसेच ते या पदासाठी चांगला पगार देखील देतील, असे त्यांनी म्हटले आहे.

नेमकी कोणत्या क्षेत्रात संधी? -

एलेनी यांनी टिक-टॉक व्हिडिओ बनवून माहिती दिली आहे. तुम्ही एखाद्या अॅपसाठी काम करणार असाल, तर युझर त्या अॅपच्या कोणत्या फिचर्सला जास्त पसंती देतात आणि कोणते फिचर्स युझर्सला आवडत नाही याचा डेटा तुम्ही गोळा करू शकता. जे फिचर्स युझर्सला आवडत नाहीत, किंवा अॅपच्या कुठल्या सेक्शनला युझर्स भेट देत नाहीत, त्याबाबत कसे काम करायचे? याबाबतचा सल्ला तुम्ही कंपनीला देऊ शकता. यासाठी कुठल्याही विद्यापीठाच्या पदवीची गरज नाही. पण, यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण घेतलं तर काहीच गैर नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. या कामाला सध्या कोणी गांभीर्याने घेत नाही. मात्र, कंपन्यांना अशा व्यक्तींची गरज आहे.

किती असेल पगार? -

डेटा अॅनालिसिसच्या क्षेत्रात जर तुम्हाला २ वर्षांचा अनुभव असेल तर तुम्ही ६१ लाख रुपये पगार देखील कमावू शकता. तसेच या क्षेत्रामध्ये सरासरी बेसिक पे हा ३३ लाख रुपये असल्याचे एलेनी सांगतेय.

सर्वोत्कृष्ट डेटा अॅनालिसिस बनण्यासाठी काय करायचे? -

सर्वोत्कृष्ट डेटा अॅनालिसिस बनण्यासाठी काय करायचे, असे त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, प्रत्येक व्यक्तीचे कौशल्य वेगवेगळे असते. पण, डेटा गोळा करून त्याचे आकलन करण्याची क्षमता ज्या व्यक्तीमधअये असेल ती व्यक्ती सर्वोत्कृष्ट डेटा अॅनालिसिस बनू शकते. तुम्ही कुठलीही विशेष पदवी घेतली नसेल तरी या क्षेत्रात काम करू शकता. पण, कंपनीच्या भागधारकांसोबत बोलताना तुमच्यात आत्मविश्वास असायला पाहिजे.

कंपन्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याच्या विचारात आहेत. २०२० मध्येच ही नोकरभरती होणार होती. मात्र, कोविडच्या संकटामुळे होऊ शकली नाही. आता कंपन्या आपला कार्यक्षेत्र वाढविण्याकडे लक्ष देत असून या क्षेत्रात अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT