Word sakal
एज्युकेशन जॉब्स

‘अ’ ऑनलाइनचा : एका शब्दावरून उत्तर तयार

अभ्यासाचे हे तंत्र वापरून बघा बरं. प्रत्येक शब्दातील अद्याक्षरे वेगळी करत त्यांचा एक नवा शब्द तयार करून त्याचा वापर केला तर. हा अक्षर समूह एक शब्द म्हणूनच ओळखला जातो.

अभिजित पेंढारकर

अभ्यासाचे हे तंत्र वापरून बघा बरं. प्रत्येक शब्दातील अद्याक्षरे वेगळी करत त्यांचा एक नवा शब्द तयार करून त्याचा वापर केला तर. हा अक्षर समूह एक शब्द म्हणूनच ओळखला जातो. यालाच इंग्रजीमध्ये ‘ॲक्रोनीम’ असे संबोधले जाते. संक्षेप रूपाने शब्द मांडताना अनेक शब्दांमधून एक नवा शब्द उदयाला येतो. म्हणजे बघा हं आपण जेव्हा UNESCO हा शब्द वापरतो त्याचा अर्थ United Nations Educational, Scientific and Cultural Organisation असा होतो. एवढे सारे शब्द लक्षात ठेवण्यापेक्षा केवळ एकच शब्द लक्षात ठेवणे सोपे जाते. परंतु त्याचा विस्तारित शब्द आपोआप लक्षात रहातो. प्रत्येक अक्षर कोणत्या शब्दासाठी आहे ते लक्षात येते. जसं की ‘अ’ ऑनलाइनचा! दैनंदिन जीवनात असे अनेक संक्षिप्त रूपात मांडलेले शब्द आपल्याला पहायला मिळतात. याच तंत्राचा आपण अभ्यासात उपयोग केला तर?

उत्तरे लक्षात कशी ठेवायची...

केवळ या एका शब्दावरून संपूर्ण उत्तर लक्षात ठेवणे शक्य होते. संक्षिप्त रूपात माहिती लक्षात ठेवणे सोपे जाते. ज्या उत्तरांमध्ये स्मरणशक्ती अपेक्षित असते तिथे या तंत्राचा नक्कीच फायदा होतो. शब्दामधील प्रत्येक अक्षरापासून तयार होणार शब्द लक्षात ठेवणे शक्य होते. उत्तर लिहिताना याच शब्दावरून कल्पनाविस्तार करता येणे शक्य होते. स्वयंअध्ययनाचे तंत्र म्हणून ॲक्रोनीमचा वापर करता येईल. आपल्या पाठ्यपुस्तकातून एखाद्या विषयातील संकल्पनेच्या संदर्भात असे शब्द आपल्याला तयार करून ठेवता येतील. मोठी उत्तरे किंवा उत्तरातील असणारे प्रमुख मुद्दे विचारात घेउन आपल्याला या तंत्राचा उपयोग करणे नक्कीच फायद्याचे ठरू शकेल. तुमचे स्वतःचे असे हे संक्षिप्त शब्द तयार असतील. इतरांना कदाचित त्यातील अर्थ माहीत होईलच असे नाही. पण मुद्दे लक्षात ठेवणे यातून सहज शक्य होणार आहे.

‘तानापिहीनीपाजा’ या अक्षरांच्या मालिकेवरून इंद्रधनुष्यातील रंग आणि त्याचा क्रम लक्षात ठेवणे सोपे जाते. ‘कछमतेगोगु’ हा नव्याने शब्द आपण तयार केला आहे. याचा अर्थ काय? तर महाराष्ट्राला लागून असणारी राज्ये. क कर्नाटक, छ छत्तीसगड, म मध्यप्रदेश, ते तेलंगणा, गो गोवा, गु गुजरात! असे अनेक शब्द तुम्हाला तयार करून ठेवता येतील. प्रश्न म्हटला की त्याला अनुसरून केवळ एक शब्द लक्षात ठेवला की झाले. उरलेले सर्व आपल्याला आपोआपच यायला लागेल.

बघा अभ्यास करण अजिबात तापदायक होणार नाही. उलट तो करताना मजा येईल, वेळ ही छान जाईल. घ्या कोणताही विषय आणि करा सुरुवात असे नव नवे शब्द बनवायला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT