Balak Palak Sakal
एज्युकेशन जॉब्स

बालक-पालक : ‘ध’चा ‘मा’!

‘‘आई, एखाद्या अर्थाचा अनर्थ करणे, यादृष्टीने इतिहासातला संदर्भ असलेला वाक्प्रचार काय आहे गं? शब्दकोड्यात लिहायचा आहे!’’ दादानं आईला विचारलं.

अभिजित पेंढारकर

‘‘आई, एखाद्या अर्थाचा अनर्थ करणे, यादृष्टीने इतिहासातला संदर्भ असलेला वाक्प्रचार काय आहे गं? शब्दकोड्यात लिहायचा आहे!’’ दादानं आईला विचारलं.

‘ध’चा ‘मा’ करणे!’ आईनं स्वयंपाकघरातूनच ओरडून उत्तर दिलं आणि ते शब्दकोड्यातल्या जागेत अगदी चपखलपणे बसल्यामुळं दादा खूष झाला.

‘‘पण याचा अर्थ काय? आणि ऐतिहासिक संदर्भ काय आहे?’’ त्यानं उत्सुकतेनं विचारलं. मग आईनं त्याला ‘ध’चा ‘मा’ करणे म्हणजे काय, त्याची कहाणी समजावून सांगितली. दादालाही ती फारच आवडली. छोटीही उत्सुकतेनं ऐकत शेजारी बसली होती. तिला फारसं कळलं नाही, पण अधूनमधून मान मात्र डोलावत होती.

शब्दकोडं तर पूर्ण झालंच, पण एक नवीन शब्द शिकायला मिळाल्याचा आनंदही दादाच्या चेहऱ्यावर दिवसभर तरळत राहिलेला आईला लक्षात आला.

‘‘आई, आज संध्याकाळी काय करणारेस जेवायला?’’ दुपारची जेवणं झाल्यानंतर निवांत पसरलेल्या धाकटीनं आईपाशी चौकशी केली.

‘‘आज माझी सुट्टी आहे. आठवडाभर रोज नवीन काहीतरी करून मी दमून जाते की नाही? आज तुम्हीच काय ते शिजवा. तसंही बाबांनी रविवारच्या संध्याकाळच्या जेवणाची जबाबदारी घेतलेली आहेच. हा विषय तेच बघतील!’’ आईनं जाहीर करून टाकलं आणि निवांत पुस्तक वाचत बसली.

बाबा तर घरी नव्हते. त्यांना आज रविवार असूनही ऑफिसचं काम लागलं होतं. दुपारी जेवायलाही ते घरी आले नव्हते. आता संध्याकाळी ते कधी येणार, त्यांचं काम कधी पूर्ण होणार, जेवणाविषयी त्यांच्याशी काय बोलायचं आणि मुळात, जेवणाची जबाबदारी घेऊन ते काय करणार, असे असंख्य प्रश्न मुलांना पडले होते.

‘‘चिंगे, बाबा आल्यावर जेवण म्हणजे करून करून काय करतील, सांग बरं!’’ दादानं प्रश्न विचारला.

‘‘खिचडी!’’ धाकटीनं ताबडतोब उत्तर दिलं.

‘‘बरोब्बर!’’ दादानं तिच्या उत्तराला दाद दिली, पण त्यात उत्साह नव्हता.

‘‘आणि एवढं करून आपल्यालाच मदतीला घेणार.’’

‘‘हो ना... तांदूळ धुऊन दे, कूकर पुसून घे, डाळ काढून दे, हे कर... ते कर...!’’

दोघांनाही पुढचं सगळं चित्र दिसायला लागलं होतं.

‘‘पण आता करायचं काय? आईनं तर साफ नकार दिलाय काहीही करायला. बाबांनी तरी आईला स्वतःहून सांगायची काय गरज होती?’’

‘‘बघ ना... बाबा म्हणजे ना...!!’’ दोघांची कुरकूर चालूच राहिली.

पाच वाजून गेले, तरी बाबा आले नव्हते. आता ते आल्यावर खूपच दमलेले, कंटाळलेले असणार, हेही स्पष्टच होतं. तेवढ्यात बाबा आले आणि त्यांच्या खोलीत फ्रेश व्हायला गेले. आई तिच्या हातातल्या पुस्तकात रमून गेली होती. अधूनमधून तिचे आठवडाभर राहिलेले काही फोन करून घेत होती. एकूणच ती काही स्वयंपाकघराकडं फिरकण्याची लक्षणं दिसत नव्हती.

‘‘आई, पार्सल आलंय. जेवायला चल!’’ असं मुलांचं बोलावणं तिच्या कानावर आलं आणि ती चमकलीच. बाहेरून जेवण मागवायचं, हे कधीच ठरलं नव्हतं.

‘‘बाहेरून का मागवलं जेवण?’’ आईनं जरा नाराजीनंच विचारलं.

‘‘बाबांनीच सांगितलं.’’

‘‘असं कसं सांगतील ते?’’

‘‘अगं, तूच तर म्हणाली होतीस ना?’’

‘‘काय म्हणाले होते?’’

‘‘आज तुम्हीच काय ते मागवा! आम्ही ते बाबांना सांगितलं आणि त्यांनी मागवलं!’’ मुलांनी खुलासा केला.

‘‘मी ‘मागवा’ नाही, ‘शिजवा’ म्हणाले होते मी! स्वतःच्या सोयीनं शब्दांची आलटापालट करण्यात अगदी पटाईत आहात तुम्ही..!’’ आई लटक्या रागानं म्हणाली, तोपर्यंत मुलांनी पार्सलची पाकिटं फोडायला घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT