Balak Palak
Balak Palak Sakal
एज्युकेशन जॉब्स

बालक-पालक : मापात पाप

अभिजित पेंढारकर

‘माझी भाताची मापाची वाटी कुठे गेली?’’ आईनं शंखनाद केल्यावर घराला जाग आली.

‘कुठली वाटी?’’ थोरल्यानं मोठेपणा दाखवत विचारलं.

‘इथे भात लावायला छोटी वाटी ठेवलेली असते... ट्रॉलीच्या वरच्या ड्रॉवरमध्ये. ती कुणी हलवली? सापडत नाहीये कुठे!’’

‘एवढंच ना? मग दुसरी घे की!’’ थोरल्यानं मोठ्या समस्येवरचा रामबाण उपाय सांगितल्याच्या थाटात तिला सांगितलं.

‘तेवढं मलाही कळतं. पण ती मापाची वाटी आहे. ती वाटी वापरली, की सगळ्यांना पुरेल एवढा भात होतो. भाताचा अंदाज चुकत नाही.’’

आई खुलासा करत असतानाच धाकटी तिथे आली.

‘आणि ती वाटी वापरली नाही तर?’’ तिनं उगाच मध्ये नाक खुपसलं.

‘मग भात कमी तरी पडतो किंवा जास्त तरी होतो. एकतर तुमची रोज खायची नाटकं. कधी भात हवा असतो, कधी नको असतो. कधी तुमचा मूड बदलेल, याचा नेम नसतो. उगाच शिळं अन्न खावं लागतं नाहीतर टाकून तरी द्यावं लागतं. दोन्ही मला अजिबात आवडत नाही. म्हणूनच मी ती मापाची वाटी वापरते. ती कुणी घेतलीय, तेवढं सांगा!’’ आईनं दोघांनाही बजावलं. वाटीबद्दल मुलांना अजिबात कल्पना नव्हती. दिवसभर आईनं वाटी शोधली, पण त्यातून काहीच हाती लागलं नाही.

दोन दिवस घरात भात शिजलाच नव्हता. दोन दिवस आधी शेजाऱ्यांकडेच जेवायचं निमंत्रण होतं. दुपारी जेवण जास्त झाल्यामुळे रात्री कुणी फारसं काही खाल्लंच नव्हतं. आदल्या दिवशी बाहेर जेवायला जायचा प्लॅन आधीच ठरला होता. शिवाय संध्याकाळी मावशीनं पाठवलेलं पीठ वापरून आईनं डोसे केले होते. त्यामुळे भात करण्याचा विषय निघालाच नव्हता. आज सगळे घरी असल्यामुळे कुकर लावायचा प्रश्न आला, तेव्हा तिला वाटीची आठवण झाली.

आईनं त्या दिवशी कसाबसा कुकर लावला, पण वाटी न सापडल्यामुळे तिची अस्वस्थता काही कमी होईना. बाबा दौऱ्यावर गेले होते. दुसऱ्या दिवशी रात्री ते आले. जेवताना त्यांच्या कानावर हा विषय गेला.

‘वाटी अचानक कुठे हरवली असेल, कुणास ठाऊक. सगळ्यांना विचारून झालं. आता भाताची मापाची वाटी हरवली म्हणून पोलिस स्टेशनला कंप्लेंट द्यायची तेवढी बाकी राहिलेय!’’ आईनं त्रागा केला.

‘बघू या हं आपण,’ असं म्हणून बाबांनी तो विषय दुसरीकडे वळवला. मग त्यांच्या दौऱ्यातल्या गमतीजमती सांगितल्या, इतर काही गप्पांचे विषय निघाले.

जेवण झाल्यानंतर ते हळूच खिडकीपाशी गेले आणि कट्ट्यावरच्या कोपऱ्यात ठेवलेली एक वाटी त्यांनी आईकडे आणून दिली.

‘ही वाटी... ही तिथे कशी गेली?’ आईनं प्रश्न विचारलाच.

‘अगं, हिचाच प्रोजेक्ट होता ना, झाडाच्या पानांचे वेगवेगळे आकार तयार करण्याचा! त्यासाठी काही आकार तयार करायला आम्ही ही वाटी घेतली होती.’

‘आम्ही म्हणजे बाबांनी. मला काहीच माहीत नव्हतं.’ धाकटीनं लगेच हात झटकून टाकले. आई धुमसत राहिली.

‘ही वाटी पुन्हा स्वयंपाकघरातून हलवू नका. आज मोठी वाटी घेऊन मी भात लावला, तो किती उरलाय बघा. आता उद्या सकाळी फोडणीचा भात खायचा! कुणीही तक्रार करायची नाही!’ आईनं बजावलं. चूक आपलीच असल्यामुळे बाबाही गप्प होते, मुलांनाही शांतपणे ऐकून घ्यावं लागलं.

एकच दिवस मध्ये गेला आणि आईच्या करारी आवाजानं पुन्हा एकदा घर दणाणून गेलं.

‘दुधाची पिशवी कापायची कात्री असते ओट्यावर, ती कुणी घेतलीय? सापडत नाहीये सकाळपासून!!’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT