एज्युकेशन जॉब्स

बालक-पालक : अवघे धरू सुपंथ...

‘मला पण. आणि ती साधीसुधी नको हं...! छान गुळगुळीत कव्हर आणि मस्त वास येणारी कोरी पानं असलेली..!’

अभिजित पेंढारकर

‘मला पण. आणि ती साधीसुधी नको हं...! छान गुळगुळीत कव्हर आणि मस्त वास येणारी कोरी पानं असलेली..!’

‘मला नवीन वर्षाची डायरी हवेय!’

‘मला पण. आणि ती साधीसुधी नको हं...! छान गुळगुळीत कव्हर आणि मस्त वास येणारी कोरी पानं असलेली..!’

‘ह्यॅ! तुझं अक्षर किती घाणेरडं आहे...! छान डायरीत कोंबडीचे पाय काढून ठेवशील तू!’

‘आणि तुझं अक्षर म्हणजे कोळ्याचं जाळं. नुसतं गोल गोल आणि गिचमीड!’

मुलांची जोरदार भांडणं लागली होती.

‘‘काय हवंय तुम्हाला?’’ आजीनं मध्यस्थी केली.

‘आम्हाला नवीन वर्षाची डायरी हवेय. पण बाबांना विचारलं, तर ते म्हणतील, जुन्यातल्या काही डायऱ्या पडलेल्या आहेत, त्या वापरा,’ थोरली म्हणाली.

‘आणि आई म्हणेल, तुम्ही काहीच लिहीत नाही, तर डायरी हवी कशाला?’ धाकट्यानं कुरकूर केली.

‘बरं, मी बोलते आईबाबांशी,’ असं म्हणून आजीनं रात्रीच्या जेवणाच्या वेळी डायरीचा विषय काढला.

‘मी पण यंदा नवीन डायरी घ्यायचा विचार करतोय. अनेक नोंदी करायच्या असतात, त्या राहून जातात,’ बाबा म्हणाले आणि मुलांनी आश्चर्यानं बघितलं.

‘मलाही एक डायरी घ्यायचीच आहे.’ आईनं पुस्ती जोडली आणि मुलांचा हुरूप वाढला.

‘आईबाबांनाही डायरी घ्यायचेय, म्हणजे आपल्याला तर नक्कीच मिळेल,’’ थोरलीनं धाकट्याच्या कानात खुसपुसून सांगितलं.

‘त्या डायरीत लिहिणार काय?’ आजीनं विचारलं.

‘कविता, रोजचे हिशोब, चांगले विचार, घरातल्या कामांच्या नोंदी, वाढदिवस, स्पोर्ट्स स्पर्धांचं टाइमटेबल, जमाखर्च, गुंतवणुकीचे आकडे...’’ काय काय उत्तरं मिळाली.

‘गेल्या वर्षात ह्यातलं काय लिहिलंत?’ आजीनं विचारलं, तसे आईबाबा आणि मुलं सगळेच एकमेकांच्या तोंडाकडं बघायला लागले.

‘पण यंदा नव्यानं सुरुवात करायचेय, आई!’ बाबांनी सांगून टाकलं. एकूणच सगळ्यांचा सूर असा होता, की डायरीत मनातल्या गोष्टी नोंदवायच्या आहेत, काय चुकलं, काय बरोबर आलं, सगळं लिहायचं आहे.

‘ठीकेय, घरातल्या प्रत्येकानं काही ना काही नवीन लिहायचा संकल्प केलाय ना? आपण सगळ्यांसाठी एक स्पर्धा ठेवू.’ आजीनं सुचवलं.

‘या वर्षात आपल्या हातून काय काय चुका झाल्या, त्या एका वहीत, कागदावर, डायरीत कुठेही लिहायच्या. त्या सगळ्यांना वाचून दाखवायच्या. ज्यानं नेमक्या पद्धतीनं, प्रामाणिकपणे लिहिलं असेल, त्यालाच छानशी डायरी मिळेल.’’

आजीनंच फर्मान काढल्यामुळं कुणालाच तक्रार करायला वाव नव्हता. आई, बाबाही अगदी मनापासून कामाला लागले. एकमेकांची कॉपी करायची प्रबळ इच्छा सगळ्यांनाच होती, पण आजीचं सगळ्यांवर लक्ष होतं. अडचणीचा मुद्दा एकच होता, तो म्हणजे आपल्या चुका दुसऱ्यांना वाचून दाखवायच्या होत्या. म्हणजे त्यांना चिडवायला, टोकायला संधी मिळेल, असं प्रत्येकाला वाटत होतं.

आजीनं दिलेली मुदत संपली आणि सगळेच आपापले कागद घेऊन बिचकत बिचकत समोर आले.

‘आधी कोण वाचतंय?’’ आजीनं विचारलं, तशी घरात पुन्हा शांतता पसरली. कुणीच सगळ्यात आधी वाचायला तयार होईना. सगळ्यांनी लिहिलं मात्र अगदी मनापासून होतं, हे आजीच्या लक्षात आलं.

‘कुणीही चुका वाचून दाखवायची गरज नाही. चुका कळाव्यात, त्या सुधारल्या जाव्यात, म्हणून ही स्पर्धा घेतली होती. कुणाच्या चुका दाखवण्यासाठी नाही!’’ आजी म्हणाली. ‘‘आपापल्या चुका समजल्या असतील, तर त्या पुढच्या वर्षी करू नका, म्हणजे झालं!’’ तिनं सांगितलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. टेन्शन दूर झालं. सगळेच हास्यविनोदात रमले.

आजीनं नुकत्याच बाजारातून आणलेल्या चार छानशा डायऱ्या प्रत्येकाला दिल्या.

‘पुढचं वर्ष संपताना ह्या नक्की तपासल्या जातील हं!’’ असा प्रेमळ दमही दिला आणि त्यांच्याबरोबर हसण्यात सहभागी झाली.

(समाप्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT