Balak Palak
Balak Palak Sakal
एज्युकेशन जॉब्स

बालक-पालक : खरेदीचा शुभमुहूर्त

अभिजित पेंढारकर

‘या वर्षी दिवाळीला अजिबात नवीन कपडे घ्यायचे नाहीयेत हं!’’ आईनं महिनाभरापूर्वीच घोषणा करून टाकली होती. खरंतर दिवाळी हाच कपडे किंवा नवीन गोष्टी घेण्यासाठीचा खरा मुहूर्त. ‘दिवाळी हा सण आपल्या देशात उत्साहानं साजरा होतो. प्रकाशानं अंधकारावर मात केली जाते, नव्या उत्साहानं पाहुण्याचं स्वागत केलं जातं, नवीन कपडे खरेदी केली जाते,’ असं काय काय मुलांनी दिवाळीवरच्या निबंधांमध्ये लिहिलं होतं. आईनंच त्यांना ही वाक्यं सांगितली होती. तरीही प्रत्यक्षात मात्र आईनं दिवाळीत खरेदी करायची नाही, असं का सांगून टाकलं, ते काही मुलांना समजत नव्हतं.

दिवाळीला अवकाश होता, तोपर्यंत मुलं जरा निवांत होती. मात्र दिवाळीला अवघे दोन आठवडे राहिले, तेव्हा मात्र ही अस्वस्थता थोडी वाढताना दिसली. घराच्या अगदी जवळ चांगल्या कपड्यांचा एक सेल लागला होता. एरवी कुठले कुठले सेल शोधून काढून तिथं खरेदीला, किंवा नुसती भेट द्यायला जाणारी आई यावेळी ह्या घराजवळच्या सेलकडंही फिरकली नाही, तेव्हा परिस्थिती गंभीर आहे, हे मुलांच्या लक्षात आलं.

‘‘अरे, आधीचेच चांगले चांगले कपडे आहेत घरात, त्यामुळे यंदा नवीन कपडे नकोत, असं आईनं ठरवलं आहे.’’ बाबांनी खुलासा केला.

‘‘हो, पण आईला वेगवेगळ्या कपड्यांची आवड आहे. कुठल्या कार्यक्रमाला कुठले कपडे घातले होते, इथपासून सगळं तिच्या लक्षात असतं,’’ धाकटी कुरकुरली.

‘‘फक्त स्वतःचेच नाही, दुसऱ्यांनी कुठले कुठले कपडे वापरलेत, कुणाकडं काय काय कपडे आहेत, हेही तिच्या माहीत असतं,’’ मोठ्यानंही जोड दिली.

‘‘अरे हो, पण यंदा तिला वाटलं असेल, की आहेत पुरेसे कपडे. नुसती दिवाळी आहे म्हणून नवीन घ्यायला नकोत. काय वाईट आहे? तुम्ही आता उगाच खरेदीला निमित्त काढू नका. आई म्हणालेय ना, यंदा काही नवीन घेणार नाही, मग तेच फायनल.’’ बाबांनी दोघांना जरा दामटून गप्प केलं. या चर्चेवर, विशेषतः बाबांच्या शेवटच्या वाक्यावर, एका कोपऱ्यात बसून निवांत पुस्तक वाचत बसलेली आजी का हसली, हे मात्र मुलांना कळलं नाही.

दिवाळीला वेळ आहे, असं म्हणता म्हणता मधले दिवस कसे भुर्रकन निघून गेले, कुणालाच कळलं नाही. आई खरेदीला जायचं नाव काढेना, तेव्हा मात्र मुलांचा धीर खचण्याची वेळ आली. यंदा नवीन कपडे काही मिळणार नाहीत, आधीच घेतलेल्या कपड्यांवर भागवावं लागणार, हे त्यांनी ओळखलं.

दिवाळीला आता अवघे आठ दिवस उरले होते. ह्या आठवड्यात खरेदी केली नाही, तर पुढच्या आठवड्यात थेट दिवाळीच. एका निवांत दुपारी आई कपाट उघडून सगळं आवरायला बसली होती. मावशीही त्याच दिवशी घरी आली होती, दोघींच्या गप्पा सुरू होत्या.

‘‘हा ड्रेस तू रिद्धीच्या साखरपुड्याच्या वेळी घातला होतास ना गं ताई?’’ मावशी म्हणाली आणि आईचा उत्साही चेहरा जरा उतरल्यासारखा वाटला.

‘‘यंदा दिवाळीची काय खरेदी?’’ मावशीनंच विचारलं. काही क्षण घरात शांतता पसरली. अध्येमध्ये लुडबूड करणारी धाकटीही जरा गप्प झाली.

‘‘हो गं, राहिलेय खरेदी. वेळच मिळाला नव्हता. आम्ही ह्या शनिवारी जाऊन घेऊ कपडे,’’ आईनं लगेच सांगून टाकलं. ‘‘तू पण येणारेस ना गं, चिंगे?’’ धाकटीकडं बघून आई म्हणाली आणि धाकटीची कळी एकदम खुलली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT