Admission issue due to low percentage 12th passed students education  sakal
एज्युकेशन जॉब्स

Education News : कमी टक्क्यांमुळे बिघडणार प्रवेशाचे गणित ?

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षांमध्ये मात्र चांगले गुण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बारावीच्या निकालात गुणांचा टक्का कमी झाल्याने जेईई मेन, नीट आणि सीईटी या प्रवेश परीक्षा दिलेल्या राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. परिणामी, विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचा ‘कट-ऑफ’ खाली येण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेली बारावीची परीक्षा १४ लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील एक लाख ३१ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी मिळवली आहे.

तर चार लाख १२ हजार ३९६ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षांत चांगले गुण आहेत. परंतु बारावीला प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित विषयांत अपेक्षित गुण मिळाले नसल्याने विद्यार्थी-पालक सातत्याने नाराजी व्यक्त करत आहेत. यासाठी अनेक विद्यार्थी, पालक ‘श्रेणीसुधार’चा पर्याय निवडण्याची शक्यता शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.

शिक्षक, अभ्यासकांनी नोंदविलेली निरीक्षणे

  • जेईई, नीट, सीईटीसारख्या प्रवेश परीक्षांकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष केंद्रित

  • त्या तुलनेत बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष

  • व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांत चांगले गुण

  • विशेषत: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित विषयांत गुण कमी

बारावीच्या परीक्षेत विशेषत: विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी विविध प्रवेश परीक्षांच्या अभ्यासाची जोमाने तयारी करत आहेत.

त्यातील चाचणीचा सरावही सातत्याने केला. परंतु, या प्रवेश परीक्षांचा अभ्यास करतानाच बोर्डाच्या परीक्षेची तयारी देखील होईल, असा समज विद्यार्थ्यांनी करून घेतला. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेकडे त्यातील मूलभूत अभ्यासाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी, बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे दिसून येते.

- मेधा सिन्नरकर, प्राचार्या, लक्ष्मणराव आपटे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय

बारावीत तुलनेने कमी टक्के आणि प्रवेश परीक्षांत चांगले गुण असणारे असंख्य विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी प्रवेश परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत कमी वेळात बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याचा सराव अधिक करतात. परंतु बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सविस्तर आणि वर्णनात्मक उत्तरे लिहिण्याचा सराव या विद्यार्थ्यांनी फारसा केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच बारावीच्या निकालात त्यांना कमी गुण मिळाले आहेत. परंतु, प्रवेश परीक्षांत चांगले गुण असल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात फारशा अडचणी येणार नाहीत.

- केदार टाकळकर, समुपदेशक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT