hsc exam sakal
एज्युकेशन जॉब्स

बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेश पत्र शनिवारपासून मिळणार

जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) शनिवारपासून (ता. ९) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) शनिवारपासून (ता. ९) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) शनिवारपासून (ता. ९) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर सकाळी अकरा वाजल्यापासून कॉलेज लॉगिनमध्ये ही प्रवेशपत्रे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

जुलै-ऑगस्ट २०२२मध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी बारावीच्या परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशी सूचना राज्य मंडळाने केली आहे.

प्रवेशपत्रामध्ये विषय आणि माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. तसेच, प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT